Wednesday, June 5, 2013

फ़ुकट तिथे फ़ॅमिलीसकट !

"हॅलो, कम्युनिटीमधे जेवण आहे आत्ता. येतोस का?" - मित्र
"कधी आत्ता? कोणी सांगितलं?" - मी
"अरे बोर्ड लावला आहे एट्रंस गेटच्या बाहेर. मी ऑलरेडी रांगेपाशी पोचलो आहे. तू येणार असशील तर लवकर पोहोच" - मित्र
"तिथे कुठे बसून खाणार रे? काहीतरी वाटतं ते!" - मी
"अरे हवं तर घरी घेउन जा. इथे सगळे असंच करतात. तू ये लवकर मी वाट पाहतो" - मित्र

माझं आणि मित्राचं मागच्या आठवड्याच्या मंगळवारी संध्याकाळी साधारण साडेसात वाजता झालेलं हे बोलणं. मी आणि सोनल घरात बोलतच होतो की संध्याकाळी जेवायला काय करायचं करुन. पण ही ’भगवानकी पार्टी’ऐकल्यावर वाटलं एकदम योग्य वेळी फोन आला. लगेच मी आमच्या वर राहणाऱ्या अजुन एका जोडप्याला फोन करुन आमच्यासोबत यायचा आग्रह केला.
 (भगवानकी पार्टी म्हणजे - अचानक कुठुन काही फ़ुकट मिळालं तर देवाचं देणं - अर्थात भगवानकी पार्टी म्हणाय़चं असं आमच्या मित्राने लावलेला नवीन शोध!)
ऍटलांटाला रहायला लागल्यापासुन मी आमच्या कम्युनिटीमधे बऱ्याचदा गेट टूगेदर बद्दल ऐकलं होतं. दर महीन्यातुन एकदा एक इवेंट होतो किंवा लंच/डिनर/ब्रेकफ़ास्ट असं काय काय असतं वगैरे वगैरे.असली सोशल सर्विस करणारं कम्युनिटीमधलं एक जोडपं घरी येउन जाहीरातही करुन गेलं होतं. त्यामुळे ’हे असतं तरी काय?’या भावनेपोटी आम्ही दोघंही कम्युनिटी हॉलपाशी दाखल झालो.
तशी आमची कम्युनिटी मोठी आहे. २ स्विमिंग पूल आणि जवळपास २५ बिल्डिंग्ज वगैरे आहेत. कम्युनिटी हॉल जिथे आहे तिथेच जिम, बार्बेक्यू करुन जीवनाचा आनंद लुटायची जागा, स्विमिंग पूल असा सगळा पसारा आहे. आमच्या घरापासुन साधारण ते अंतर ४०० मीटर असेल. घरातुन बाहेर पडताच कम्युनिटीमधले सगळे लोकं त्याच भागाकडे चालत जाताना आम्हाला दिसले. पुण्यात गणपती बघायला गेलो असताना,’जबरी डेकोरेशनचा गणपती’कुठे आहे याचा सुगावा लागल्यावर लोकांची गर्दी जशी तिकडे वळते; तशी ही गर्दी मला वाटली. त्यावेळी कम्युनिटीमधे जर कोणी पाहुणा आला असता तर नक्कीच बिचारा चक्रावून गेला असता एवढा असंतूष्ट मॉब पाहून.
जरा पुढे गेलो तर जवळपास प्रत्येक बिल्डिंगमधून लोकंच लोकं बाहेर येत होते. इतके लोकं मी तरी कधीच पाहीले नव्हते कम्युनिटीमधे. एका अर्थाने चांगलं पण वाटलं इतके भारतीय पाहुन. मिनी इंडिया बघितल्याचा फ़ील आला. (त्या दिवशीचं हे माझं शेवटचं चांगलं वाटणं होतं हे मला नंतर समजलं!)

हळूहळू अजून चार बिल्डिंग्जना वळसा घालून आम्ही हॉलपाशी पोचलो आणि अक्षरश: चक्रावुन गेलो. अरे इथे तर फ़क्त ’भारतीय’च आले आहेत! तोबा गर्दी नुसती. अगदी गावाकडली जत्राच जणू! आया आपापल्या पोरांना हाताला धरुन नुसत्या ओढत होत्या. फ़रफ़टत चड्ड्या सावरत लहान मुलांची वरात त्यांच्या मागुन चालली होती आपली. कशाचा कशाला पत्ता नाही. "ऑनसाइट" ला असलेल्या आपल्या मुलाकडे काही महीने रहायला आलेले त्यांचे वडील परीटघडीचे कपडे घालुन प्रामाणिकपणे रांगेत उभे होते. ह्या वडील लोकांचं एक चांगलं असतं बघा; बाहेर चला म्हणलं की लगेच फ़ॉर्मल कपडे घालून तय्यार! आपल्यामुळे लेकाला त्रास होऊ नये कसलाही. सगळ्या आयासूद्धा साड्या वगैरे नेसून खाली ’पॅरॅगॉन’अथवा ’हवाई’चप्पल घालून कार्यक्रमाचा आनंद लूटायला पोचल्या होत्या!
तर, असा नजारा पहात आम्ही कसेबसे गर्दीतुन वाट काढत सरपटणाऱ्या रांगेच्या अंताला पोचलो एकदाचे. जिम आणि पत्रपेटीची भिंत याच्या मधल्या बोळातल्या एका बारक्या प्रवेशद्वारामधून निमंत्रितांना आत प्रवेश दिल्या जात होता.त्याच जागेतुन आतल्या अन्नाचा लाभ घेतलेले तृप्त लोकं ढेकरा देत देत बाहेर पडत होते. काही नशीबवान लोकांच्या हातात मी भरलेल्या प्लेट्स पण पाहिल्या. एकंदरीतच आत काय पहायला, खायला आणि भोगायला मिळणार आहे याची जराशी झलक मिळाली तिथे.
रांगेत किमान २५ लोकं तरी असतील आमच्या समोर उभी. लहान मुलं ’आमचा नंबर कधी लागणार, पप्पा?’च्या अविर्भावात आयांचा हात धरून कशीबशी उभी होती बिचारी. कोणाला तेव्हाच नेमकं पकडापकडी खेळायची होती तर कोणाला घरीच जायचं होतं. प्रत्येकाचा वेगळा मूड. बापांच्या चेहऱ्यावर’सांगितलेलं तुला! काही अर्थ नाहीये इथे थांबण्यात’वाला मूड होता. हे पाहुन तर अगदी पोटात गोळाच आला माझ्यातर.
एकदाचे आम्ही धक्काबूक्की करत आत पोचलो. बघतो तर काय, घोर निराशा हा शब्ददेखील कमी पडेल असा नजारा नशीबी आला! दोन्ही बाजुंना टेबलं मांडून स्वयंसेवक थंडगार झालेल्या पिझ्झ्याचे २-२ तुकडे एका प्लेटमधे टाकून हसल्यासारखा चेहरा करत भारतीयांच्या गळ्यात मारत होते. मी हातात प्लेट घेतली तर त्या गोऱ्याने माझ्याकडे - "आला हा फ़ुकटा खायला" वाल्या नजरेनी पाहीलं; चीज पिझ्झा हवा का ग्रीन पेपर? असं विचारत दोन तुकडे टाकले आणि पुढे रवानगी केली. तिरुपतीच्या मंदीराच्या गाभ्यातही यापेक्षा जास्त वेळ उभं रहायला मिळालं होतं मला! त्याच्या नजरेतला थंडपणा त्या पिझ्झा मधे उतरलेला होता! स्वयंसेवकाचं काम हे अगदी थॅंकलेस असतं हे फ़ार तीव्रतेने जाणवलं मला. इतकी गर्दी आणि एकंदरीतच कधी काही मिळालं नसल्याचा फ़ील देणारे लोकं पाहुन, कुठुन या ऍक्टिविटी मधे नाव रजिस्टर केलं असं नक्की वाटलं असणार त्यांना. सिनेमा हॉलच्या बाहेर उभा असलेला गेटकीपर जसा असतो, तिकीट पाहून आत सोडतो; तसा अनुभव. लोकांच्या गराड्यात प्लेट्स चा अंदाज घेत टाका आपले पिझ्झे त्यात!
त्याच तात्पुरत्या उभ्या केलेल्या टेबल्सच्या भवती संपलेल्या पिझ्झा बॉक्सेसचा गराडा पडला होता. किमान शंभर लार्ज पिझ्झा बॉक्सेस असणार तिथे. भुकेलेल्या लोकांनी क्षणार्धात फ़स्त करुन टाकलं सगळं! आमच्या हातात प्लेट यायला जवळपास ८ वाजले होते म्ह्णजे सांगितलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास जास्त. त्यात साधारणत: ३०० माणसं येउन खाउन पण गेली होती.चेहऱ्यावर उसनं हसू आणत, लहान मुलांशी चेष्टामस्करी करत ते लोकं पटापट प्लेट्स लावत होते. मधेच नजर वर करत वाढती रांग आणि कमी होत चाललेले पिझ्झे याचा अंदाज लावत यांत्रिकपणे हात चालवत होते ते लोकं. ४ जणंच होते म्हणा पण करत होते बिचारे. पलीकडेच वेगवेगळी शीतपेयं अर्थात कोक, पेप्सी, स्प्राईटच्या लार्ज बॉटल्स ठेवल्या होत्या. थंडगार पिझ्झ्याचे तुकडे घशाखाली ढकलायला मती सुन्न करणारं द्रव्यच लागू पडणार ना. त्याशिवाय अन्न पचणार कसं? आपापल्या ग्लासेस मधे कोक ओतून घेऊन जागा शोधत असताना मागे वळुन पाहीलं तर काय? लोकं परत परत घ्यायला येत होते! हे पाहुन तर अगदी शरमच वाटली मला. सोनल तर हे सगळं बघून घरी जाऊया, घरी जाऊया चा घोष करायला लागली. पण सगळा ग्रुप दिसल्यावर आम्ही तिथेच थांबायचं ठरवलं.
मित्रांसोबत बसुन गप्पा मारताना अजून किस्से समजले आजच्या या सोहळयाचे. काही लोकं म्ह्णे घरून "वॉलमार्ट" च्या पिशव्या घेऊन आलेले होते. दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या ब्रेकफ़ास्टची सोय व्हावी म्ह्णुन! एक आज्जी होत्या म्हणे, त्यांनी तर कहरच केला. सगळ्या घरच्या लोकांच्या वाटणीचं भरुन आल्यानंतर एक एक करत पिशवी मधे कोंबलं आणि सर्वांच्या देखत निघुन गेल्या चक्कं! ऑर्गनायजर्सने मित्रांना वगैरे बोलवा असले निमंत्रण दिले होते तर आपले लोकं त्याचा मान राखुन इतर कम्युनिटीमधे राहणाऱ्या लोकांना घेऊन आले होते. ते पण सगळे सकाळपासून उपास धरलेले; इथेच सोडायचा हट्ट! कार काढुन आले ४-४ लोकं!

काय म्हणावं या प्रकाराला आता. लाज काढायचे धंदे सगळे! बरं, त्यांच्या घरच्यांना पण काही नाही त्याचं. "असंच करत असतो आम्ही" हा तोरा. त्यात ही म्हणे सो कॉल्ड पूल साईड पार्टी! म्हणजे लहान मुलांना तर अगदी उतच यायला हवा. कधी एकदा खातो आणि पाण्यात जातोय अशी त्यांची भावना. सगळ्या आया पण पॅंट, पायजामा, जीन्स हलकेच फ़ोल्ड करुन जेमतेम पोटरी आत जाईल इतका पाय पाण्यात सोडून "थोडकेमे मजा" वाल्या स्टाईलने बसल्या होत्या. एक एक पिझ्झा संपला की पोरांना अजून उत्साह चढायचा. आणि लाडकं पोर म्हणल्यावर आई वडील तरी काय बोलणार?
लवकरच त्या पूल मधे १-२ पेपर प्लेट्स, ३-४ कोकचे डिस्पोजेबल ग्लासेस आणि तत्सम पदार्थ तरंगायला लागले! उत्साही नवऱ्यांनी आपापले ’डिएसएलआर’बाहेर काढुन ते क्षण टिपायला सुरुवात केली. सगळे खुष. काढणारे आणि काढुन घेणारे! कुणी काठावरुन सायकल चालवतंय, तर कुणी पकडापकडी खेळतंय. मुली एका पायाने जोर देत ढकलत पुढे जाणारं सायकल सदृश वाहन खेळत गोंधळात भर घालतंय. तर उरलेली लहान मुलं पाण्यात शिरुन बॉल अथवा पाणी उडवण्यात धन्यता मानतंय. गलिच्छ्पणा आणि अव्यवस्थितपणाचा कहर. आपल्यासाठी अगदी शोभेलसी परिस्थिती!
कदाचित आम्ही नवीन असू या दृष्यांना किंवा परक्या देशात इतके भारतीय लोकं पहायची सवय नसेल कदाचित. पण फ़ारच अनकंफ़र्टेबल होतं ते सगळं. मला प्रवासवर्णनं वाचायला कायम आवडतात. मनापासुन एंजॉय करतो मी ते. अमेरीकेला यायच्या आधी मी जाणीवपुर्वक खुप प्रवासवर्णनं वाचली. हौशा नवश्यांनी लिहिलेली आणि प्रॉपर लेखकांनी लिहिलेलीसुध्दा. बऱ्याच लोकांनी हे नोटीस केलं होतं की आपल्याच लोकांमूळे बाहेरच्या देशात शरम वाटायची परिस्थिती येते. आणि पार उदाहरण देऊन लिहिलं होतं.आज अगदी अनूभव आला त्याचा! गेल्या १५-२० वर्षांत विदेशी आपले लोकं असायचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यात अमेरिकेमधे तर पार गर्दीच आहे. आमच्या कम्युनिटीमधे दाक्षिणात्य लोकं भरमसाठ आहेत. खरं सांगायचं झालं तर ऍटलांटामधे राहणाऱ्या भारतीयांपैकी ७० टक्के हे नक्कीच दक्षिण भारतीय असणार. आपल्याला भारतात राहुनदेखील दोघांमधला फ़रक किती जाणवतो. इकडे तर पावलोपावली त्याची झलक दिसते.
इतका गार आणि मेलेला पिझ्झा आम्ही आयुष्यात कधीही खाल्लेला नव्हता. अतिशय घाणेरडा, अंगावर येणारा अनुभव आला आज. "फ़ुकट तिथे फ़ॅमिलीसकट !" म्हण प्रत्यक्षात पहायला लावणारा ! परत कधीही असल्या गेट टुगेदरला यायचं नाही असा पण करुन मी आणि सोनल पळालो तिथुन !

Friday, May 7, 2010

माय नेम इज खान

रात्रीचे almost १२ वाजत आले आहेत आणि मी नुकताच ’My Name is Khan'नामक भयपट पाहुन उठलो आहे! माझ्या अनेक हितचिंतकांनी दिलेल्या सल्ल्याला न जुमानता हा पिक्चर पाहिलाच शेवटी मी. खूप काळजी घेतात हो माझे मित्र. त्यांचं ऐकावं असे प्रसंग फ़ार जरी येत नसले तरी हा सल्ला मी मानायला हवाच होता असं मला राहुन राहुन वाटतंय आता.

का काढला असावा हा पिक्चर त्या करण जोहरने? त्याची मुलाखत बघत होतो मी परवा. (जोहर ने केवळ मुलाखती घ्याव्यात आणि द्याव्यात असं पण वाटतं मला कधी कधी. चांगलं जमतं ते त्याला !). त्या बाई ने विचारलं,"तुम्हाला काय सिद्ध करुन दाखवायचं होतं हा चित्रपट काढुन?" पिक्चर बघुन बिचारी बसली असेल मुलाखतीला. मनातलं बोलल्याशिवाय रहावत नाही अशा वेळी ! तर यावर जोहर उत्तरले, "मला कायम लोकं romantic चित्रपटांचा बादशाह समजतात. त्यांना वाटतं मी गंभीर, सामाजिक विषयांना हात घालणारे चित्रपट काढुच शकत नाही. त्या सर्वांना माझे हे उत्तर आहे!"


अरे, हे उत्तर? आपण अनेकदा अनेक गोष्टी fantacise करतो. याचा अर्थ असा असतो का की भाबड्या प्रेक्षकांनादेखील त्यात गोवायचं आणि पापाचा भागीदार बनवायचं? अरे तुला जे सुचतं ते तु एका मोठ्ठ्या कागदावर लिहित जा आणि नशा उतरली की फ़ाडुन फ़ेकत जा ना. हा काय वेडेपणा लावला आहे? जगातले काय विषय संपले आहेत की काय?शाहरुख खान आवडतो आणि तो पण कशाला नाही म्हणत नाही याचा किती गैर फ़ायदा घ्यायचा आपण? ते चोप्रा वाले पण हेच करत असतात आपले. आठवा वीर झारा. असाच मानसिक त्रास झाला होता तो पण पिक्चर पाहुन. तो पिक्चर बरा की काय असं म्हणायची वेळ आली आहे आता.

मुळातच शाहरुखला वेगळं काही जमत नाही. autistic आजार झालेल्या इसमासारखी ऍक्टिंग करुन तो तसंच आपलं हसं करुन घेतो. गप गुमान romantic कामं करायची आणि गप बसायचं आपलं तर ते नाही. सुरुवातीपासुनच समजतं आपल्याला की हा पिक्चर ’वेगळा’ आहे. काजोलचं दर्शन आजकाल दुर्मिळ झालं आहे या एकमेवं कारणामुळॆ थोडा वेळ तरी का होईना, प्रेक्षक पिक्चर सहन करतात. नंतर त्यातला फ़ोलपणा लक्षात आल्यावर काजोल ही चित्रपटाला तारु शकत नाही.

काय स्टोरी आहे हो या पिक्चरची? काजोल रागाच्या भरात काहीतरी बोलते आणि आपला वेडपट हीरो राष्ट्राध्यक्षांना भेटायला जातो? ते पण ’माय नेम इज खान ऍंड आय ऍम नॉट टेररिस्ट’हे बोलायला?
I mean, are we mad or something? how can he expect us to buy this stuff? कसा बनु शकतो या प्लॉट वर पिक्चर? करण जोहर पिक्चर शूट करायच्या आधी कोणत्याच sensible माणसांशी बोलत नाही का? हे असलं डबडं कथानक कोणालाच आवडणार नाही हे त्याला realise होत नाही का? त्याला सगळे इतर सल्ले देणारे लोकं इतके घाबरतात का त्याला की या असल्या पिक्चरचं भविष्य कोणी predict करु शकत नाही? आपल्या मनातल्या सुप्त इच्छा लोकं (म्हणजे निरंजन अय्यंगार) करण जोहर च्या मार्फ़त पुर्ण करतात असं दिसतंय.

काय बावळटपणा दाखवला आहे रे बाबा. खान चालत चालत काय जातोय, पाण्यात काय शिरतोय, मदत काय करतोय, सगळचं अचंबित करणारं.तिथे पण फ़िल्मिपणा सोडला नाहीये शाहरुखने. सुपर हीरोला
करता येतात त्या सगळ्या गोष्टी करुन दाखवल्या आहेत २ तासात. त्यात तो न्युज चॅनलवालापण (परवीन डब्बास) ह्याच्या मागे मागे जातोय.हा उतरला पाण्यात की तो पण आला पाण्यात. कांटे की टक्कर! आणि शाहरुख असल्यामुळॆ चक्रीवादळ पण शमतं. तरी पिक्चर काही संपत नाही ! चालला आपला मुर्खासारखा प्रेसीडेंट,प्रेसीडेंट करत.

आणि काय तो ओबामा दाखवलाय! मला वाटतं तिथे या पिक्चरने आपलं उरलेलं क्रेडिट पण गमावलं! जनरल एका माणसाला आणुन उभं केलं आहे ओबामा म्हणुन. मी नक्की सांगतो, त्याला पण वाटलं
नसेल की दुर देशातुन काही (वेडे) माणसं येतील आणि आपण ओबामा सारखे दिसतो हे पटवुन देउन त्यांचं काम करायला लावतील! सारं काही अचंबित करायला लावणारं आहे!

सर्वात वाईट कशाचं वाटतं सांगु? काजोलसुद्धा फ़सली हो या विषयाला.खरं तर ती इतके खराब पिक्चर करत नाही बरं का. पण म्हणतात ना,प्यार अंधा होता है तसंच दोस्ती भी अंधी होती जा रही है असं वाटायची वेळ आता आली आहे.काजोल जशी घरात वावरत असेल तशीच ती पिक्चर मधे पण वावरते! थोडा हास्याचा खळखळाट,थोडा राग,आक्रस्ताळेपणा करत बोलणं हेच करत आली आहे ती गेल्या काही पिक्चर मधे.

आणि हो, लहान मुलांबद्दल तर आपण अजुन काहीच बोललो नाही आहोत!चोप्रा आणि जोहर कुठुन हे असले पोरं fantacise करतात कोण जाणे.माझा तर दाट संशय आहे,करण जोहर जितक्या वेळा न्युयॉर्कला जातो तितक्या वेळेला त्याला असले पोरं कुठल्या ना कुठल्या घरात सापडत असतील! बरोब्बर यांच्याच शाळेत ’जय जगदीश हरे’,’हम होंगे कामयाब’,’सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’ यासारखे गाणे वाजत असतात. हि चावरी मुलं लगोलग "Mom, what is this hindostaa?" सारखे थिल्लर प्रश्न विचारतात! लगेच सगळ्या आया मायांच्या डोळ्यातुन आसंवं टपकु लागतात. अरे धरुन बडवलं पाहीजे एकेकाला!

जोहरला अशांचा पुळका फ़ार! कुठुन कुठुन पकडुन आणतो आणि आपल्या हवाले करतो. ती कुछ कुछ होता है मधली मुर्ख मुलगी आठवा, बापाच्या प्रेयसीची बापाशी भेट घडवुन आणायला काय काय नाही करत.शिवाय कभी खुशी कभी गम मधला बालपणीचा ह्रुतिक रोशन बघा. काय एक एक नग आहेत अगदी. ’खान’ मधे इतके भयंकर मुलं नसले तरी थोडे आहेतच. त्यात भरीस भर म्हणुन निग्रोंची मुलं घेतली आहेत. शाहरुख खान पाण्यातुन वाट काढत त्यांच्यापाशी पोचला की ’हम होंगे कामयाब’ ईंग्रजी मधे translate करुन गायला लागतात सगळे.हा तर कमाल शॉट आहे पिक्चरचा.त्या बापड्यांना हे काय माहीत की शाहरुखसाठी असले स्टंट्स रोजचंच काम आहे!हे आपले बसले गात! ह्या सगळ्या पोरांना एकत्र करुन करण जोहरच्या अंगावर सोडलं पाहीजे आणि त्यांनी पण मिळालेल्या संधीचा फ़ायदा घेउन त्याला अडचणीत आणणारे प्रश्न विचारायला पाहीजेत!

या सगळ्या खेळामधे सामान्य प्रेक्षक भरडला जातोय.दर वेळी नव्या आशेने तो शाहरुख-करण जोडीचा पिक्चर पाहतो.यंदा चांगलं पहायला मिळेल या विचाराने.पण जोहर काही आपली मळलेली वाट सोडत नाही आणि शाहरुख सोडुन कुणाच्या वाटेला जात नाही. नुसत्या वरच्या चकाचकीमुळे आणि मार्केटिंगमुळे ६०-७० करोड रुपये मिळुन जातातच.पुन्हा नव्या दमाने प्रेक्षकांना वेड्यात काढायला ही जोडी तयार! शिवाजी महाराजांच्या काळात खानाने हमला केला होता तसा हा आधुनिक खान त्याच्या मावळ्यांना (करण जोहर,आदित्य चोप्रा,यश चोप्रा,फ़राह(परत)खान इत्यादी) साथीला धरुन नव्याने हमले करीत आहे!

सरतेशेवटी असं वाटतं की पिक्चरचं नाव जरी ’माय नेम इज खान’ असलं तरी शाहरुख आणि जोहरने मिळून एकदा तरी म्हणावं, "माय काम इज घाण!"

Sunday, April 19, 2009

केशकर्तनालय!

केशकर्तनालय!या जागेशी माझं काय वाकडं आहे मला माहीती नाही.लहानपणापासुन कित्येक वेळा जायची वेळ येणारं असं हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं ठिकाण आहे.आणि कोणत्याच लहान्या पोराला न आवडणारी अशी ही काळ्या पाण्याची शिक्षा आहे!

आजच सकाळी कटींगला जायचा योग आला.देवाने आम्हाला भरभरुन केस बहाल केले असल्यामुळे सलुन मध्ये जायचा मौसम सारखाच येतो.कितीही प्रयत्न केला तरीपण दिड महीन्यातुन एकदा दर्शन घडतंच.मला आठवतयं,छोटा असताना मी फ़ारच कंटाळा करायचो कटींगला जायचा.तिथे जाउन त्या केसांच्या बाजारात बसायचा मला जाम वैताग यायचा.त्यात लहान असल्यामुळे केसांची स्टाईल वगैरे तर माहीतीच नव्हती."मिडीयम करु,का बारीक करु?"एवढा एकच ठेवणीतला प्रश्न तो बाबाजी विचरत असे.आणि शक्यतो वडीलच उत्तर देत असत.आमच्या शाळेचा एक उसुल होता,मुलांचे केस इतके बारीक हवेत की धरायला गेलो तर हाताच्या मुठीत पण येऊ नयेत वगैरे.त्यात आम्ही उनाड विद्यार्थी असल्या कारणाने शिक्षकांना निमित्तच हवं असायचं धरायला.त्यामुळे लहान केस कापायची इतकी सवय झाली होती की मिडीयम आणि बारीक सोडुन इतरही स्टाईल असु शकते हे मला engineering मधे आल्यावरच समजलं!

आधी आमच्या घरापासुन थोड्या दुर अंतरावर सलुन होतं.त्या काळी ’फ़िल्मफ़ेअर’,’सिनेब्लिटझ’वगैरे फ़िल्म रिलेटेड मासिकं ठेवणारा परिसरातला तो एकटाच दुकानदार होता.त्यामुळे कटिंगसाठी वेटिंग असलं तरी याच्याकडे हमखास गर्दी व्हायची!मी पण त्याच इराद्याने सकाळी सकाळी जाउन बसायचो त्याच्याकडे.रविवारी गेलं की नक्कीच २ महिन्याचे सगळे फ़िल्मी मासिकं चाळुन व्हायची त्यामुळे माझं त्या perticular दुकानाबद्दलचं प्रेम जास्तच उफाळुन यायचं.आणि का कोण जाणे,नाभिक समाजाशी माझी ओळख पण लवकरच होत असे.दर वेळी गेलो त्याच्याकडे की ’खास’ गिऱ्हाईक आल्याच्या अविर्भावात तो मला treat करत असे.इतकच नव्हे तर या धंद्यात पैसा कमावुन त्याने कसा वारजे माळवाडीत फ़्लॅट घेतला आहे याचे रसभरीत वर्णनदेखील तो दर वेळी करत असे!

सलुनमधली मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे आतली टापटीप.अर्थात सगळीकडे ताज्या केसांचे पुंजके पडलेले असतात ते वेगळं;पण काचेची सजावट,चारही बाजुने लावलेले आरसे,लाकडी फ़र्निचरची रेलचेल,शेल्फ़मधे रचुन ठेवलेले कुठलेसे विदेशामधील भारीतले लिक्विड्स,क्रीम्स,सोप यांनी वातावरण अगदी भारलेलं असतं.बाजारात लाकडी फ़र्निचरचा कोणता नवा ट्रेंड आलेला आहे हे पाहण्यासाठी दुकानात जाण्यापेक्षा सलुन मधे जावं असं माझं फ़ार प्रामाणिक मत आहे.नक्षीकाम आणि कलाकुसर याचा लेटेस्ट बाजार तिथे मांडला असतो.हात घालाल तिथे ड्रॉवर्स,त्याच्या सोनेरी किंवा चंदेरी मुठी,चोहोबाजुने काचेचं महागडं स्टायलिंग,आत जाउन हे पाहील्यावर कधी एकदा त्या जादुच्या खुर्चीवर बसुन मुद्द्याला हात घालतो असं वाटत असतं.हो खरच,जादुचीच असते ती खुर्ची.Otherwise मानेचा सपोर्ट स्टॅन्ड वर खाली करता येऊ शकणारी खुर्ची आपण आणखीन कुठे पाहीली आहे?शिवाय उंची पुरत नसेल तर एक गोल आकाराची उशी आणुन,ती त्या खुर्चीवर ठेऊन त्यावर आपल्याला बसवायचे.मज्जाच मज्जा!तिथे बसेपर्यंत कोणत्याच बकऱ्याला त्यातला धोका कळत नाही.एकदा का तिथे बसलो की संपलं सगळं.मग ती ऑपरेशनच्या आधी घालायचा असतो तसल्या हिरव्या रंगाच्या गाऊनसारखा एक कपडा आपल्या गळ्याभोवती गुंडाळतात आणि बेफ़ाम कत्तलीला सुरुवात होते!तिथे ही आधी मिडियम का बारीक?हा ठेवणीतला प्रश्न असतोच;आजकाल मी पण त्याचं तोडीस तोड उत्तर शोधुन काढलं आहे."कमी करा,पण खुप बारीक नको!!"आता मला सांगा,या उत्तराने कोणाला काय समजणार आहे?तरी तो आपल्या निर्विकार स्टाईलने कैची उचलतो आणि बाजीप्रभुंच्या तलवारीसारखी यांची कैची चहुबाजुने फ़िरु लागते.

सुरुवातीला मागुन केस कापल्या जात असल्याने जरा आणखीन निरीक्षण करायची संधी मिळते.भारतातल्या जवळपास प्रत्येक सलुनमधे हमखास आढळणारी एक वस्तु म्हणजे वेगवेगळ्या पोजेस मधे केसांची ’हेअरस्टाईल’असलेले मॉडेलस!ते जवळपास प्रत्येक ठिकाणी सारख्याच लुकमधे असतात म्हणुन कदाचित ’नेहमीचे यशस्वी’या catagory मधे मोडतात!त्याहूनही पुढची मजल पहायची असेल तर बारकाईने या मॉडेलसकडे बघा.त्या उभरत्या कलाकारांमधे एक त्या कटिंग करुन देणाऱ्या माणसांपैकीच असतो!लग्गेच आपली नजर सगळ्यांवर फ़िरते.एखाद्याची चंपी करत तो तिथेच उभा असतो.आपण ते फोटो पाहुनच त्याच्याकडे पहात आहोत हे त्याला एव्हाना सरावाने समजतं.तो पण लगेच एक आश्वासक स्माईल देउन धंद्याला लागतो!या पोजेसचं सर्वात जास्त वैशिष्ठ्य म्हणजे बाहेर कोणीच तशी स्टाईल करत नाही.ते कसं असतं,फ़ॅशन शो मधले कपडे प्रत्यक्षात कोणीच घालत नाही ना,तसच काहीसं.ते कपडे फ़क्त तिथेच थोडावेळ मिरवायला असतात,शो संपला की काढुन आपापले कपडे घालुन सगळे घरी.इथेही तोच मामला.स्वतःवर ती स्टाईल कशी दिसेल ह्याचा आपण फ़क्त विचारच करु शकतो.कारण असं वळण देण्यासाठी आधी तितके मोठे वाढवावे लागतात केस.मनातल्या मनात आपणही मागुन वळवलेले केस,पुढून कोंबडा काढलेले केस,मधला भांग,सोल्जर कट,अर्धवट कल्ले ठेवलेला लूक असं सगळंच स्वत:वर ट्राय करुन पाहतो.त्यातही आणखीन धमाल म्हणजे या मॉडेल्सच्या डोळ्यावर गॉगलदेखील असतो!!आता गॉगलची इथे काय गरज आहे हे विचार करुनपण समजत नाहीच.किती तो कुल दिसण्याचा प्रयत्न!

अशी हेअरस्टाईल करुन द्यायची कोणतंच गिऱ्हाईक फ़र्माईश करणार नाहीये हे माहीत असल्याने जय्यत तयारीनिशी आपला जवान फ़ायनली केसात हात घालतो.स्प्रिंग लावलेल्या त्या बॉटलमधुन जेव्हा सर्वात पहिल्यांदा पाण्याचे तुषार डोक्याच्या परिघावर पडतात,तेव्हा समजुन घ्यायचं,की आपण आता त्यांच्या पुर्णपणे तावडीत सापडलो आहोत.पुढचा किमान अर्धा तास मान वेडीवाकडी वळवत डोक्यावरच्या वारणावताच्या जंगलाचा आता नाश होणार आहे.समॄद्धीने भरपुर अशा या प्रदेशातुन काय काय बाहेर पडेल या काळजीत आपण जीव मुठीत धरुन कत्तलीला सामोरे जातो.

डोक्यावर दाब देत देत कधी कधी नको असतानादेखील डोकं खाली दाबत आपला जवान केस कापायला सुरुवात करतो.साधारण १० मिनिटं झाले की "हं,आता इकडे बघा,आता तिकडे पहा"वगैरे बोलत तो साईडने कापाकापी करतो.जर नशीब चांगलं असलं तर थोड्याफ़ार गप्पापण होऊ शकतात.माझ्या चांगल्या नशीबामुळे मला कायमच गप्पिष्ट जवान मिळालेले आहेत.आमच्या समोरच्या दुकानातले सगळे लोकं एकाच फ़्लॅट मधे राहतात.हे दुकान जेव्हा टाकलं तेव्हा स्थानिक नगरसेवकाकडुन कसं उदघाट्न केलं होतं,त्यांनी पण आग्रह मानुन लगेचच कशी दाढी करवुन घेतली होती(!)वगैरे रम्य कहाण्या मी ऐकलेल्या आहेत.लगेच मी पण "अरे व्वा","हो का","क्या बात है!"वगैरे वगैरे शब्द उदगारवाचक चिन्हांसकट बोलुन त्याला खुष करुन टाकतो.दुपारी धंद्याला जोर नसतो म्हणुन मग कसा साईड धंदा म्हणुन ड्रायक्लिनींग आणि झेरॉक्सचं मशिन लावलं आणि कसा फ़ायदा झाला ही त्याची सक्सेस स्टोरी नक्कीच दाद देण्याजोगी असते.शिवाय गावाकडले तरुण पोरं,मामाचा मुलगा,आत्याचा नातलग वगैरे सगळेच जणं इथे येउन बसतात आणि फ़ावल्या वेळात धंद्यातली मर्म शिकतात.स्वतःही कमवावं,बाकीच्यांना मदत करावी अशी माफ़क समाजसेवा ते पण करतात.अपण बरं,आपलं काम बरं असा सरळ साधी विचार करणारी ही सामान्य माणसे आहेत.महत्वाचं म्हणजे त्यात कुठेही अभिमान अथवा अहंकार नसतो.

इतकं सगळं बोलत बोलत एकदाची कटिंग पण होऊन जाते.आणि आता दुकानातला सर्वात मनोरंजक प्रकार माझ्या समोर (खरं तर मागे)येतो.मानेच्या मागे वस्तरा लाउन तिथे ’शेप’ दिला की तुमची कटिंग संपली हे सप्रमाण सिद्ध होतं!आता तो मागे नेमकी कशी कापली आहे हे दाखवायला म्हणुन एक भला मोठा आरसा तुमच्या मानेसमोर धरतात!आता या प्रकारामुळे काहीही होत नसतं.आधीच कापलेले केस य दाखवादाखवीमुळे बदलणार तर नसतातच.उलट काही चुकलं असेल तर ते हायलाईट होतं!बरं,ते दुरुस्त व्हायची शक्यतापण धुसरच असते.तरी तो इमानेइतबारे तो आरसा धरतो,आपणही यांत्रिकपणे मान डोलवत बरोबर असं बोलतो(आणखीन काय बोलणार म्हणा!)आणि याचबरोबर एका नाट्यमय घटनेचा शोकात्मक अंत होतो!पुढचा दिड महीना तरी ते केस कापण्याइतके वाढणार नसतात आणि मला या जागी परत यायची वेळ येणार नसते.जड अंतःकरणाने मी तिथुन उठतो,बाजुला ठेवलेल्या अनेक कंगव्यांपैकी एक उचलतो आणि उरलेल्या केसांना वळण देण्याचा प्रयत्न करु लागतो.

अखेर तिथुन जायची वेळ येतेच.ठरलेले २५ रुपये देउन मी बाहेर पडतो.लहानपणापासुन माझं कटिंगसाठी annual budget ठरत आलेलं आहे.या दुष्क्रुत्त्यावर वर्षाकाठी १०० पेक्षा जास्त रुपये खर्च करायचे नाहीत ही लहानपणापासुन लागलेली सवय आहे!त्यामुळेच १०० रुपड्यात वर्षात ४-५ वेळा कटिंग होत असेल तर मी पण तितक्यांदाच करतो.आपला असा चोख हिशोब असतो बघा!कधी पैसे कमी पडले तर माझं कटिंगला जायचं प्रमाण पण कमी होतं!!तेव्हा मात्र मित्रांकडुन बोलणी,धमक्या खाव्या लागतात.कॉलेजला असताना मी एकदा १० महीने केस कापले नव्हते!!कधी कधी ते दिवस आठवुन माझं मलाच हसु येतं.आता हे सगळे बालिश प्रकार वाटतात पण त्या त्या वयात ते फ़ार exciting आणि धाडसी असतं.

कटिंगच्या प्रक्रियेमधे असलेल्या सगळ्या processes पुर्ण करुन एकदाचा मी घरी आलेला असतो.दर वेळी काहीतरी नवा अनुभव घेउन!

Thursday, February 19, 2009

When Sunil Gavaskar visits us....



Last week we had the privilage of having Sunil Gavaskar in our office,Siemens. Since the mail 1st float about his visit, everyone was enthusiastic about getting a chance to meet him. We all see him on Television channels more than often and it indeed was a great meeting with him.

The crowd was asked to assemble in the canteen space exactly at 11:10 since he was about to reach office at 11:15. I never thought our company has so much employee strength ! The entire hall was jam packed with people standing in every corner. Even the director level All Hands meeting doesnt get so much audiance !!

People started feeling restless once it was 11:25 and whoever came into the hall after that, started getting applauses and shouting :). After much waiting (yeah, 15 mins is a long wait for these IT guys !) finally we sensed that something IS happening outside. And here came the moment! We saw our boss bringing Sunil along with him and let me tell you, the clapping continued for almost a min !!!

He looks exactly the way he features on TV! Same height, same smile and more importantly same presence of mind while answering questions! Clad in a White Deutsche bank T Shirt and Khakee Trouser, he looked calm and into his comfort zone right from the word go. After the usual thanksgiving speech and a small honour ceremony, he stood to deliver speech.



Now here is a man who is completely from a different background as far as Cricket and any other field is concerned, Gavaskar was ready with his one liners and analogies to combine both Cricket and software field. He spoke for about 30 mins and mainly discussed how recession for a common man and bad patch for a batsman is somewhat on a similar line. The examples that he gave were pretty much logical and that impressed the audiance very much. Infact we all were so awed by his mere presence, that even if he had discussed Rocket Science or Barrack Obama or any damn thing, we would have listened to it with equal eager!

The last part of the whole visit was by far the best one since we got a chance to take a photograph with him-not individually but in a group. I even got a chance to have a word with him while he stood with us since he was next to me while clicking the photo!!

I today realise that what does that mean when we say he came, he saw, he conquered ! Sunil Gavaskar's visit certainly proved that !!!!

Friday, February 6, 2009

शोले!

शोले!! यापेक्षा काही भारी,मोठं,उत्कृष्ठ,भव्यदिव्य,अविश्वसनीय,इतक्या प्रचंड प्रमाणावर होऊ शकतं का परत? किती ही इतिहासाच्या आत पार वाकुन पाहीलं तरीपण उत्तर नकारार्थीच येईल.खरं तर गरजच काय आहे वाकुन पहायची?ज्या पिक्चरला हिंदी चित्रपटाच्या जवळपास ७५ वर्षांच्या इतिहासातला सर्वोत्तम पिक्चर म्हणुन गौरवण्यात आलं आहे,तिथे तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या सर्टिफ़िकेट्ची काय गरज?बस्स,नाम ही काफ़ी है!काय काय म्हणुन नाही आठवत या पिक्चरबद्दल? त्या काळची सर्वात तगडी स्टारकास्ट,झालेला अवाढव्य खर्चं, बनवण्यास लागलेला वेळ,हवे ते कलाकार न मिळाल्यामुळे secondary choice असलेल्या कलाकारांसोबत करावं लागलेलं काम,अमर झालेली जवळपास सगळी पात्रं शिवाय शोलेशी रिलेटेड असलेल्या सगळ्या कथा,काही दंतकथा सगळी कहाणी एका झटक्यात नजरेसमोरुन सरकते.समीक्षक,परीक्षक,सामान्य प्रेक्षक सर्वांनी वाखाणलेला शोले जेव्हा १५ ऑगस्ट १९७५ ला रीलीज झाला तेव्हा अवघ्या २ दिवसात पब्लिकने आपल्या नापसंतीची मोहोर त्यावर लावुन टाकलेली होती.
"भिकार पिक्चर!हात नसलेला माणुस काय असा २ भाडोत्री गुंडांना बरोबर घेउन व्हिलनला मारतो काय?बकवास!"शो बघुन बाहेर येणाऱ्या जवळपास थोड्याफ़ार फ़रकाने अशीच reaction देत होते.नाही म्हणायला पिटातल्या प्रेक्षकांना मात्र हा मारधोडीचा मसालापट आवडला होता;पण एकंदरीत चित्र काही फ़ार चांगलं नव्हतं.लगेचच अमिताभच्या घरी एक आपात्कालीन बैठक बोलावण्यात आली. अमिताभ,जया,धर्मेंद्र,हेमा,रमेश सिप्पी,अमजद खान आणि सलीम-जावेद असे सगळे stakeholders हजर होते."पिक्चरची लांबी फ़ार आहे.आधीच ३ तासांच्या वर गेला आहे पिक्चर.थोडी रिळं कापुयात आणि काही भाग री-शूट करुयात."कुणीतरी सुचवलं.परंतु सिप्पी साहेब शांत.ते फ़ारसा बदल करण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेवटी बऱ्याच चर्चेनंतर असं ठरलं की काहीही फ़ेरबदल न करता आहे तसा पिक्चर चालु ठेवायचा.झालं.शेवटी व्हायचं तेच घडलं!सोमवारपासुन हळुहळु माऊथ पब्लिसिटीने पिक्चर वर चढायला लागला.लोकांना गब्बरचा थरार,जयचा संयत अभिनय,वीरुचा रांगडा अवतार,हेमाची वाह्यात बडबड,ठाकुरचा सुडाने भरलेला प्रवास यातलं काही ना काही आवडायला लागलं.आणि नंतरचा अदभुत प्रवास तर जगजाहीर आहे.
तसं बघायला गेलं तर सरळ साधी स्टोरी आहे पिक्चरची.मुळचा रामगढचा असणारा पोलिस इन्सपॅक्टर ठाकुर एका गब्बरसिंग नावाच्या कुख्यात गुंडाला चकमकी मधे पकडतो.त्याचा सुड म्हणुन गब्बर जेलमधुन पळुन जाऊन ठाकुरच्या संपुर्ण कुटुंबाची निर्घुण हत्या करतो.त्याच्याशी दोन हात करायला गेलेल्या ठाकुरला आपलेच दोन हात गमवावे लागतात.शेवटी पुर्वी आपल्याच (असलेल्या) हाताखालुन गेलेल्या दोन गुंडांना हाती घेऊन ठाकुर गब्बरचा नायनाट करतो!वरवर साध्या वाटणाऱ्या या स्टोरीमधे भरपुर मालमसाला भरलेला होता.आणि याला सर्वाधिक फ़ुलवण्याचं काम केलंते सलीम-जावेद या संवाद लेखकांच्या द्वयीनं.साध्या वाटणाऱ्या स्टोरीलाईनला केवळ पॉवरफ़ुल डायलॉगच्या द्वारे एका अदभुत पातळीवर आणुन ठेवण्याचं काम ही जोडी कायम करत असे.प्रत्यक्ष डायलॉग लिहायच्या वेळी सलीम सवाल तर जावेद जवाब अ़सं करत करत ते सीन्स पुर्ण करत असत.दोघेपण आपापल्या क्रिएटिव्ह जवानीमधे,शिवाय काहीतरी जबरदस्त करुन दाखवायची उर्मी यामुळे अतिशय तडफ़दार संवाद लिहुन त्यांनी दिग्दर्शकाचं काम आणखीन सोपं करुन टाकलं होतं.पुर्ण मारामारीच्या या पिक्चर मधे त्यांनी इमोशन,रोमान्स,कॉमेडी,त्याग या सर्वांचा वापर अतिशय खुबीने केलेला होता.शोलेचं एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याची पटकथा घट्ट बांधलेली होती.कुठेही या जोडीने कथेवरची आपली हुकुमत घालवली नव्हती.प्रत्येक character असं सेट होतं.गडबड,गोंधळ नाही.इंद्रधनुष्याचे सात रंग कसे एकत्र असले तरी प्रत्येकाचं आपापलं स्वतंत्र अस्तित्व असतं,प्रत्येकाची वेगळी आयडेंटिटी असते,तसंच काहीसं झालं होतं या प्रमुख पात्रांचं.प्रत्येकाचा रोल defined होता.अर्थात यात कुण्या एका व्यक्तिरेखेवर नकळतदेखील अन्याय होणार नाही याची खबरदारी लेखक जोडीने आधीच घेतलेली होती.असे केल्याने ठाकुर,जय,वीरु,गब्बर,राधा,बसंती ही प्रमुख पात्रे तर भाव खाउन गेलीच,पण ५-१० मिनिटांच्या छोट्या छोट्या भुमिकेमधे असणारे कलाकार जसे की सांभा,कालिया,ईमामचाचा,हरीराम नाई,मौसी,रामलाल,सुरमा भोपाली,देखील आपला ठसा उमटवुन भारतीय प्रेक्षकांच्या मनात दिर्घकाळ रेंगाळली.किती भारी असेल ना रमेश सिप्पी?आपल्या हातुन भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वोत्तम कलाकृती बनणार आहे ही कल्पनाच किती exciting असेल ना?काय फ़ौज उभी केली होती त्यांनी!अभिनेते,लेखक तर होतेच दिमतीला,पण द्वारका द्विवेचांसारखा जबरदस्त कॅमेरामन त्यांनी उभा केला होता.जेव्हा शोले बनवायचा ठरला त्यावेळी रामगढ्चं लोकेशन फ़ायनलाईज करायला द्वारका द्विवेचा आणि रमेश सिप्पी गावोगाव भटकले.मनासारखं ठिकाण काही सापडेना.बंगलोर मधल्या कुणीतरी सुचवलं,बंगलोर-म्हैसुर हायवेवर एक रामनगरम् नावाची जरा खडकाळ जागा आहे.ती कदाचित तुमच्या उपयोगाला येऊ शकेल.लागलीच आपली दुक्कल तिथे जाऊन लोकेशन फ़ायनल करुन आली.द्वारका द्विवेचांच्या डोळ्यासमोर दगडांच्या चढावावर गब्बरच्या घोड्याच्या मागे पाठलाग करणारा ठाकुर दिसत होता.एक महान कलाकृती हळुहळु आकार घ्यायला लागली होती!जसं लोकेशन फ़ायनल होत गेलं,इकडे ऍक्टर्सचं सिलेक्शन हळुहळु होत गेलं.बसंतीची भुमिका हेमा करेल आणि राधाच्या रोलसाठी जया भादुरी फ़िट्ट बसेल हे साधारण आधीच ठरलं होतं.जयाने जयच्या रोलसाठी अमिताभच्या नावाचा आग्रह धरला.लक्षात घ्या,ही गोष्ट आहे १९७३ च्या सुमारासची जेव्हा अमिताभचा कौतुकाने सांगण्यासारखा फ़क्त "आनंद" हा एकच पिक्चर रिलीज झाला होता.त्यातही त्याने रंगवलेला शांत,गंभीर डॉ.भास्कर बॅनर्जी पाहुन जयच्या रोलला हा कितपत न्याय देऊ शकेल अशी शंका कोणाच्याही मनात येणं स्वाभाविकच होतं.परंतु जया ऐकेनाच."अमितला घ्या नाहीतर मी राधाचा रोल accept करणार नाही".अशी धमकी दिल्यावर सिप्पी साहेब जरा नरमले आणि इतिहास घडायच्या दिशेने आणखी एक पाऊल पडलं!दुसरीकडे धर्मेंद्रची वर्णी पिक्चरमधे ऑलरेडी लागली होती पण ठाकुरच्या रोलसाठी.जेव्हा त्याला समजलं की वीरुच्या against हिरोईन हेमा असणार आहे त्याच क्षणी त्याने सिप्पीजवळ वीरुच्या रोलचा आग्रह धरला.त्या दिवसांमधे दोघांचं प्रेमप्रकरण अगदी जोरात चालू होतं आणि धर्मेंद्रला कसंही करुन हेमासोबत टाईम स्पेंड करणं जास्त महत्वाचं होतं:) शेवटी वीरुसाठी धर्मेंद्र आणि ठाकुरसाठी संजीव कुमारचा नंबर लागला.इतकं करुन एक महत्वाचा ऍक्टर अजुन निवडायचा राहीलाच होता.शोलेची जान,पिक्चरचा आत्मा असा गब्बरसिंग उर्फ़ हरीसिंगच्या अतिशय क्रुर व्यक्तिरेखेसाठी योग्य व्हिलनची निवड व्हायची होती.याची स्टोरी तर आणखीनच मजेदार आहे.आधी सिप्पीसाहेब डॅनीला approach झाले.डॅनी कसा,मुळातच व्हिलन दिसतो! ते त्याचे टिपिकल मिचमिचीत डोळे,बसकं नाक आणि एकंदरीत सिक्किममधे राहणाऱ्या लोकांसारखा लुक हे सगळे प्लस पॉईंट्स होते.नेमका तेव्हा तो फ़िरोज खानच्या धर्मात्मा साठी काम करत होता आणि तितक्या सलग तारखा त्याच्याकडे available नव्हत्या.त्यामुळे नाईलाजामुळे सिप्पीसाहेबांनी दुसरा चेहरा शोधायला सुरुवात केली.
५० च्या दशकातल्या फ़ार राजबिंड्या दिसणाऱ्या आणि कायम भारीतले रोल करणाऱ्या जयंत या veteran कलाकाराच्या मुलाला-अमजद खानला ही भुमिका द्यायचं ठरलं.तेव्हा जयंत जरी पिक्चरमधे काम करत नसले तरी असणारा मान हा वादातीतच होता.शिवाय बड्या अभिनेत्याचा मुलगा म्हणुन अमजदकडे तसंच भांडवल होतं.तरीदेखील आवाजामधे असलेला एक बारीक पोत बघता तो गब्बर सारख्या हिंस्त्र माणसाचा आवाज म्हणुन कितपत सुट होईल याबद्दल सिप्पीसाहेबांच्या मनात शंकाच होती.कसाबसा अमजद सिप्पीसाहेबांना convince करण्यात यशस्वी झाला व बघता बघता बाकी कलाकारांचं सिलेक्शन होऊन पिक्चर फ़्लोअरवर गेला!आपला कलाकार आणि तंत्रज्ञांचा ताफ़ा घेऊन सिप्पीसाहेब बंगळुरात दाखल झाले.त्या वेळी रामनगरम् हे फ़ारच छोटं गाव होतं आणि तिथे कसलीच सोय नव्हती.सर्वात प्रथम थोडाफ़ार गावाचा लुक आणि फ़ील येण्यासाठी आहे त्यात थोड्या अधिक घरांची भर घालुन साधारण गावाचा सेट उभा करण्यात आला.आज धर्मेंद्रचा one of the masterpiece समजला जाणारा "बुढीयां जेलमें जाईंग और चक्की पिसींग"वाला सीन शूट करण्याकरता बकायदा पाण्याची टाकी उभी करण्यात आली(जी नंतर गावकऱ्यांनी कायम वापरुन राहुन उपयोगात आणली).एक एक गोष्टी लागत गेल्या आणि शूटींगला सुरुवात झाली.शोले हा महान जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या’शिचिनीन नो सामुराई’अर्थात’द सेव्हन सामुराई’वर बेतलेला होता.असं जरी असलं तरी सिप्पीसाहेबांनी त्यात भरपुर भारतीय रंग मिसळले होते.मला वाटतं शोलेच्या यशामधे याचापण हातभार लागला असावा.जय आणि वीरु भुरटे चोर जरी असले तरी संकटात असलेल्या माणसाला मदत करण्याची माणुसकी ते विसरले नाहीयेत.म्हणुनच ट्रेनमधे दरोडेखोरांकडुन गोळीबार झाल्यामुळे जखमी झालेल्या ठाकुरला हॉस्पिटलला नेताना ते मागेपुढे पहात नाहीत.रामगढमधल्या ठाकुरच्या घरातुन पैसे चोरुन नेताना राधा जयला पकडते तेव्हा शरमेने किल्ली वापस करणारे जय आणि वीरुच असतात.गावामधे गब्बरच्या माणसांसोबतची झालेली पहिली चकमक जेव्हा आपली जोडी जिंकते,तेव्हा ठाकुर,गावकरी आणि प्रेक्षक सगळ्यांनाच जाणवतं की हे दोघं मिळुन गब्बरला किमान फ़ाईटतरी देऊ शकतील.उगाच नाही ठाकुर अभिमानाने गर्जना करत,"जाकर कह दो गब्बरसे,रामगढ्वालॊंने पागल कुत्तोंके सामने रोटी डालना बंद कर दिया है!!"व्वा!बघता बघता आपल्या जोडीचं नाव पंचक्रोशीमधे पसरु लागतं आणि गब्बरला त्याच्या ढिल्या होत जाणाऱ्या पकडीची जाणीव व्हायला लागते.तसा तो ताबडतोब उठतो आणि जातीने रामगढवर हमला करतो!
तिथेही जय आणि वीरु त्याचा नेटाने सामना करतात आणि सगळे प्लान्स उधळुन लावतात.शेवटी निर्णायक घाव घालायची वेळ येते.वीरु गब्बरच्या तावडीत सापडतो.बसंती मनोरंजनासाठी "जब तक है जान जाने जहां मै नाचुंगी" असं म्हणत जय येईपर्यंत वेळ काढते.शेवटच्या हातघाईच्या लढाईमधे सख्ख्या मित्रासाठी जय स्वत:च्या जीवाची पर्वा न करता किल्ला लढवत राहतो आणि सर्व काही ऒके आहे ह्याची खात्री करुन मित्राच्या मिठीतच आपले प्राण सोडतो! एका मुक प्रेमकहाणीचा झालेला अंत आपल्याला पहावा लागतो.चित्रपटाचा आता शेवट जवळ आला आहे.आयुष्यभराचे असलेले वैरी ठाकुर आणि गब्बर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत.हात नसलेला ठाकुर पाहुन गब्बरच्या जगायच्या आशा पुन्हा उंचावतात."आओ ठाकुर,अभीतक जिंदा हो?" असं म्हणत पुर्वी हिणवणाऱ्या गब्बरकडे पाहुन ठाकुरचे डोळे त्वेषाने भरतात.’बदले की आग’,’खुन का बदला खुन’वगैरे वगैरे सारे भाव त्यावेळी प्रेक्षकांना पहायला मिळतात.हात नसलेला ठाकुर गब्बरला कसा मारणार याबद्दलची असलेली प्रेक्षकांची उत्सुकता अगदी ताणली जाते.तोच "सापको हात से नही पैरोंसे कुचला जाता है गब्बर,पैरोसे!" असं म्हणत ठाकुर रहस्यभेद करतो.खिळे ठोकलेला बुट पाहुन गब्बरची पळापळ होते.याला आता ठाकुर कसा मारणार याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता अगदी ताणली जाते.दोन्ही हातांवर बुट रगडत गब्बरचे हात रक्तबंबाळ होताच आपले पोलिस मित्र तिथे पोचतात.पुर्वी इन्सपॅक्टर राहिलेल्या ठाकुरला पोलिस कानुनचे हात कसे आणि किती लांब आहेत याची जाणीव करुन देत गब्बरला आपल्या ताब्यात घेतात.इकडे परम मित्राच्या जाण्याने कष्टी झालेला वीरु खिन्न मनाने ट्रेनमधे बसायला निघतो तो बसंती त्याची वाट पहात डब्यामधे आधीच बसलेली असते!इथेच थांबत एका पॉझिटीव्ह एंडवर सिप्पी साहेब चित्रपट पुर्ण करतात.
सुमारे तीन तासांहुन अधिक काळ कथेशी समरस झालेले प्रेक्षक भारावुन हॉलच्या बाहेर पडतात.असा पिक्चर त्यांनी कधी पाहीलेला नसतो आणि असा पिक्चर परत कधी बनणार ही नसतो!शोले आज एक दंतकथा बनलेली आहे. तसे पाहता फ़ार काही स्पेशल नव्हतं त्यात.पण सगळं कसं जुळून आलं बरोब्बर.स्टोरी,अभिनेते,दिग्दर्शक तर होतेच पण संगीताने देखील आपला खारीचा वाटा उचलला होता.पंचमच्या कारकिर्दीमधल्या टॉप २० मधे पण शोले कुठे नसेल पण पिक्चरच्या फ़्लोमधे,’कोई हसीना जब रुठ जाती है’सारखे गाणेसुद्धा खपुन गेले.कौतुक करण्यासारखं फ़क्त ’मेहबुबा,मेहबुबा’होतं.मला तर वाटतं,गाण्यांपेक्षा background music जास्त भारी होतं शोलेचं.आठवुन बघा,गब्बरच्या entryला कसे चामड्याचे बुट कराकरा वाजतात,किंवा’ये हाथ नही फ़ांसी का फ़ंदा है’च्या वेळी जेव्हा संजीवकुमारचे डोळे गरागरा फ़िरत असताना मागचं काटा आणणारं म्युझिक!आणि सर्वात brilliant तर तो सीन आहे जेव्हा जया बत्ती विझवत असते आणि अमिताभ आपल्याच मस्तीत माउथऑर्गन वाजवत असतो..तो आवाज आणखीन उदास होत जातो,बत्ती विझत जाते आणि मग सारं संपतं!Great!!आपल्या पिक्चरच्या इतिहासात असं 1st टाईम झालेलं की गाण्यांच्या बरोबरीने डायलॉगच्या पण रेकॉर्डस निघाल्या होत्या.आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे डायलॉगच्या रेकॉर्डसचा खप जास्ती होता! एक एक कॅरॅक्टर अजरामर झालं आहे शोलेचं.मग तो सांभा असु देत,कालिया असु देत,"इतना सन्नाटा क्यों है भाई?"म्हणणारे ईमामचाचा असोत अथवा "हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है"वाले जेलरसाब असोत,सगळे जणं नंतर शोलेच्या पुण्याईवर जगले.रिलीज होऊन ३०-३५ वर्ष होऊनही शोले ताजा आहे.अजुनही हास्य कार्यक्रमाच्या लोकांना शोले पुरतोय.आपापल्या कल्पनाशक्तीला ताण देत सगले कलाकार शोलेला पिळुन काढताहेत.संपुर्ण पिक्चर पाठ असणारे लाखो लोकं आज भारतात असुनही शोलेबद्दल कुठेही काहीही ऐकु आलं की लगेच सगळे जणं कान टवकारुन बसतात!काय हवय आणखीन आपल्याला?"Movie of the century"चा सन्मान मिळवुन मोठ्या दिमाखाने "शोले" आज सर्वात उंचावरुन गम्मत बघत बसला आहे!!

Wednesday, January 21, 2009

Diveagar-Perfect weekend destination...


It was for a while that we people were planning for a overnight trip and suddenly Siddharth came up with the idea of Diveagar. Since I had not even offered anyone ride in my new i10, I was more than eager to jump on this opportunity and shut my critics on this account !
The planning started some 1 month back and we finalised Diveagar on the weekend of 17/18th January 2009.Siddharth already got a joining date in Wipro in March so he wanted to enjoy his few weeks of freedom to the fullest.
Finally when we headed to Diveagar on early Saturday morning, we were total 7 ppl with 2 of them coming by ST and me,Sonal,Rohit,Sid and Vrushali coming by i10. I was not a very good driver until this trip even though its been well over 6 months since I bought this car. Somehow I manage to convince myself about driving as much as I can and later I realised,driving is not all that difficult !!
It was great fun for me to get on to the driver's shoes and the 1st patch till Kothrud to Mulshi went without any hiccups. At our 1st halt for breakfast at 8, I had decided to go till the end including the Tamhini Ghat. The joy and feeling of 'I-have-made-it' was evident on my face ! With beautiful music to sooth our ears,I went on like a born driver with confidance boosting by each passing km. Soon we crossed Tamhini ghat. This place has so many school and colleges around that Sonal humorously named it as Tamhini University and a series of related jokes followed (as happens with every situation)!
At around 9:45 we had reached near Mangaon which is a place on Bombay-Goa highway. This is the 'next-big-thing' on the highway with some sort of liveliness and typical village types chaos around. With full swing,I drove into the Mhasla road,forgetting we were running low on Fuel. Next came Mhasla, a very small place on the way to Diveagar. U get an option of going to either Srivardhan or Diveagar from Mhasla so its a sort of local junction there. Both the places are around 25-30 kms from here. We obviously took the Diveagar road.
By now, I was under visible tension for fuel.Infact we had about 10 litres of Petrol in the car, and I was consistantly getting an avg above 16-17 anywhere with i10. But still its never too bad to have a fully loaded car with petrol. Somehow we found 2 petrol pumps near by Borli, an even smaller place than Mhasla but both of them waiting for the fuel tank to come and fill their dry state. With a dejected face, we took our final route.
Finally reached Diveagar at 11:30 and got a unpleasant surprise from Awlaskar(where we had booked a room 3 weeks before) . The uncle simply refused to give us the room since we had not confirmed the bookings 2 days before !! What a looser he was..I mean,there should be some sort of professionalism if you really want to get into a good business.You just cant live on reputation for the whole of your life !
I just felt so helpless for those few moments but Sid managed to get through another deal which later turned out to be very good. We booked a cottege called "Dolphin Resort" which is run by a Pune based PMC official,Jagdish Chavan. He is also a renowned Rangoli artist running his exhibition in Ganeshotsav festival every year in Pune.
Chavan kaka welcomed us with a wide smile on his face and I was damn sure there that our stay will be extremely pleasant in his Cotteges. And what a place it turned out! Very specious room with attached Toilet,extremely clean and neat only for 1000 Rs. This can accomodate 5 ppl and you can get en extra bed for 150 bucks. A fair deal, we thought.
Just when Rohit and Sid were finalising the deal,we suddenly realised that we need to 'book' the lunch at the famous "Bapat".Here too, Chavan uncle came in for rescue and managed to book 7 lunch with Ukdiche Modak(even though the booking time was already over accoording to the rules!typical..huh?).But Bapat didnt let us down in any department with some awasome food lingering in mouth. Once we finished the lunch,everyone was so tired that we scraped the initial plan of going to beach right after lunch and headed back to catch some sleep!
Evening beach was as usual a great affair ! I am anyways scared of water since I cant swim at all,so photography was the only thing that I could engage myself in when everyone was enjoying the water and trying to pull everyone into it.Diveagar beach is not great types, but still clean enough that you can get into it without much worry. And it is long enough for the no. of tourists that are coming here so its still not THAT crowded.Bottomline, 2 hrs of uninterrupted enjoyement!!
The worst part after such type of watery enjoymment is to wait for your turn to get a good shower !! And we had our full share of waiting in the queue and got ourselves cleaned up in the order 4,5,6 and 7 !!
Meanwhile Vrushali had other plans to make me think even at such a wet condition. She wanted some inputs for her speech topic. I wasn’t at my imaginative best at that time but still we could carve out some good points for her topic.
With some good food again in the night, we finally went back to the cottege at around 11:30 . Walking in the sand on beach at night is one of the most satisfying thing you can do in the coastal area. We got ourself some sort of bonus because of the clear and pollution free sky to enjoy an extremely beautiful night view with hundreds of thousands of never-seen-before stars
That was an amazing sight to watch and remember too !
I always love to take the night on.By that I mean, I find it very exciting and satisfying to see night through. The joy of chatting throughout that span is unexplainable. There is always pin drop silence around you, and if you are sitting in some open area outside your room and have like minded people around to discuss any damn topic under the sky, its more than just joy! I had the privilage of having Sid and Vrushali accompnying me on this...we discussed n no. of things till about 3 am in the morning.Sometimes you dont even need to talk anything. Just sit back,relax and enjoy the "emptyness" of the night.A very rewarding and satisfying experience,truly !
Next day morning again had some bad treatment from Awlaskar stored for us.Dont want to get into the details though,we somehow finished breakfast and went for the final sightseeing-A very beautiful Ganesh Temple.Now it was Sid's turn to drive the car, where I sat behind-much satisfied by previous day's effort. On our way,we stop by to see the Rangoli Exhibition by Chavan Uncle. As usual, it was a sight to watch out for.
Return journey wasnt really any special as such except we all were in some nostalgic mood after spending a perfect weekend in Diveagar. With some old hindi music being played in the car, we returned back by 6:30 pm. Too good, these 2 days...:)
Some figures:
Pune -Diveagar=160 km.
Route: Pune-Chandni Chowk-Paud-Mulshi-Tamhini Ghat-Mangaon-Mhasla-Borli-Diveagar.
Dolphin Resort-Suvarna GaneshPakhadi,Diveagar-09420696499
Jagdish Chavan:09823686005
Total expenses-650 Rs per head! (Including petrol,1 night stay,3 times food etc)
Car expenses-20 ltr Fuel for 360 km.

Thursday, October 9, 2008

मुर्तिमंत चेष्टा !!

तुम्हाला जमतं आपणहुन स्वतःला मनस्ताप करुन घ्यायचा?मला जमतं !कसं सांगु,काय़ करायचं ना,जिथे जाउन आपल्याला त्रास होणार आहे(हे माहीती आहे)अशा ठिकाणी जायचं.अशाच एका ठिकाणी भेट द्यायचा योग मी घडवुन आणला.रविवारच्या रम्य सकाळी PBAP(Promoters and Builders Association of Pune) यांनी मांडलेल्या एका थट्टेला मी जाउन आलो.बाकीचे लोकं त्याला प्रदर्शन म्हणतात!अहो,प्रदर्शन कसलं,प्रत्येक स्टॉलवर चेष्टा मांडली होती.आणि आमची मजा पहायला भाड्याने आणलेले मॉडेल्स उभे केले होते.
सकाळी ११ वाजता मी सर्वात आधी जाऊन पोचलो त्या SSPMS च्या ground वर.बघतो तर काय,पोलिसांना पण आवरणार
नाही इतकी मोठी वाहनांची गर्दी आणि त्यातुनच वाट (आणि घर)शोधत चाललेले आपले जागरुक अन चोखंदळ पुणेकर!हॉल मध्ये जाण्याकरता अक्षरशः चढाओढ चालु होती तिथे.त्यातच नव्याने भरती झालेले आपले Traffic वार्डन्स.इतका गोंधळ तर चतुर्श्रुंगीच्या जत्रेमधे पण नसेल.बिचारे सगळे जणं इतके गोंधळात पडले होते,कोणाला कूठुन,कुठे,कशाला सोडाय़चं की
वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ वाजलेला होता.अशातुनच कशीबशी वाट काढत मी,अतुल आणि निलेश(उर्फ़ काका)कसेबसे त्या मोठ्या हॉलपाशी एकदाचे पोहोचलो.तोपर्यंत साधारण परिस्थितीचा अंदाज मला यायला लागला.म्हणलं,आपलं काही आज खरं नाही.आत प्रचंड गर्दी दिसते आहे.पण अहो आश्चर्यंम,आतमधे तर रिलेटीव्ह्अली कमी गर्दी निघाली.आत शिरता शिरता दाराशी उभ्या असलेल्या अनेक स्वागतसुंदरींपैकी एकीने आम्हाला ’पास’ नाही म्हणुन अडवलं.परत पास बनवायला आणखीन एक रांग.त्यातुन कसेबसे वाट काढत एकदाचे आतमधे पोचलो आम्ही.
आत गेल्यागेल्या अलिबाबाच्या गुहेमधे शिरल्यासारखा भास झाला मला.जिकडे पहावं तिकडे घरंच घरं.जो तो आपला potential buyers पकडुन,"आमचीच स्कीम कशी चांगली आहे,आमचेच घरं कसे(इतरांपेक्षा)स्वस्त आहे"अशा बढाया मारण्यात रमलेला होता.एखाद्या श्रीमंताच्या लग्नामधे जशी उंची खाद्यपदार्थांची रेलचेल असते तशी बाणेर,बालेवाडी,कोंढवा,
खराडी, पाषाण-सुस रोड,पिंपळे सौदागर,पिंपळे निलख,एनआयबिएम रोड,औंध,वारजे अशा श्रीमंत एरियांची रेलचेल होती.
मुंबईमधे आल्यावर एखाद्या गावकरयाचे डोळे दिपतात म्हणजे नक्की काय होतं ते मला इथे येउन समजलं.कुठून सुरुवात करावी हे समजेना म्हणुन साधारण(बावळट)दिसणारया एका स्टॉलवरच्या माणसाकडे आम्ही गेलो.आता विषयाला कोण सुरुवात करणार हे कळेना त्यामुळे मीच हात घातला.

"मला,तुमच्या नवीन schemes बद्दल थोडी माहीती हवी होती".
"हो हो,या बसा ना!"तोंड भरुन आमचं स्वागत करण्यात आलं.बहूदा सकाळपासुन आम्हीच पहीले थोडा ’स्पार्क’असलेले ग्राहक
वाटलो असु त्याला.चांगले कपडे असे कुठेही कामाला येतात बघा!
"अं..पिंपळे सौदागरला आपली नवीन building उभी राहते आहे.१२ मजल्यांचे १३ टॉवर्स.हा प्लान पहा.१०४५ total एरिया आणि ९१२ built-up पडेल बघा साधारण.हे असं इकडुन आत शिरलं की आधी चप्पल बुटांचा stand लागेल."
सावज हाती आलं की वाघ सिंह कसे त्यावर तुटून पडतात,तसा तो सेल्समन आमच्यावर आला.
"साधारण पाहीलं तर एकंदरीत ५७ amenities देतो आपण.त्यात मेन म्हणजे concealed gas,wooden flooring,बाथरुम मधे italian marble,सौना बाथ,स्वयंपाकघरात सगळीकडे टाइल्स,oil bound distemper,
children's play area,नाना नानी park अशा काही सोयी आहेत".हे लोकं ना,कशालाही amenities चा मुलामा चढवुन ग्राहकाला मुर्खात काढायला बघतात.ह्या असल्या amenities ऐकुन कंटाळलो होतो आम्ही लोकं.तरी त्याची अखंड बडबड मात्र चालुच होती.
"नक्की कुठे आहे ही स्कीम?"निलेशला आणखीन एक अडचणीमधे आणणारा प्रश्न सुचला.
"ही बघा,औंध ऍनेक्सला आहे".
"हो पण म्हणजे नक्की कुठे?"
"पिंपळे सौदागर".त्याने भीत भीत उत्तर दिलं.
आता मला सांगा,या पिंपळाला कोणी ऍनेक्स म्हणेल का? अहो किती दुर आहे ते ऍक्चुअल औंधपासून.हे असच चालत राहीलं तर एखाद दिवशी सातारयाला धनकवडी ऍनेक्स म्हणायला ही लोकं कमी करणार नाहीत!
माझ्या मनातले असे विचार बहुदा त्याने ओळखले असावेत.परत त्याची टकळी चालू झाली.
"अहो पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आपली बिल्डिंग परिहार चौकापासून.चौकात पोचलं की घरी फ़ोन करुन बायकोला चहा टाकायला सांगायचं.चहा उकळायच्या आत तुम्ही घरात!".
"सध्या भाव काय चालु आहे इथे?" त्याला मधेच तोडत मी प्रश्न केला आणि परीक्षेत नापास होणार हे माहीती असलेल्या मुलाच्या चेहरयावर रिझल्ट घेताना जसे भाव येतात तसे त्याच्या चेहरयावर आले.’लाख’ मोलाचा प्रश्न मी त्याला विचारला होता अन ’कित्येक लाख’मोलाचं उत्तर आता तो देणार होता.
"या प्रदर्शनानिमित्त असलेला आमचा डिस्काउंटेड रेट आहे ३८००/-पर स्क्वेअर फ़ुट.अजुन १ महिन्याने ४००० होईल."असं उत्तर देउन त्याने मोठ्या आशेने आमच्याकडे बघितलं.शपथ घेउन सांगतो तुम्हाला,१ मिनिटासाठी कोणीच काहीच बोललं नाही.मनातल्या मनात जेव्हा फ़ायनल किंमत काढुन झाली तेव्हा मात्र संताप,तिडीक,राग,असहाय्यता अशा सगळ्या भावनांचं एक मिश्रण तयार झालं.अरे,सगळे खर्च धरुन ४५ लाखांच्या वर चाललं होतं ते घर!कोण घेणार?कुठुन आणणार एवढे पैसे?

गेले अनेक महिने पुण्यामधे याबद्द्ल गावगप्पा चालु आहेत.आज तुम्ही कोणत्याही आयटी कंपनीच्या आवारात,कॅफ़ेटेरियात,
कॅंटिनमधे जाऊन पहा,सर्वजण घराच्याच गप्पा मारत असतात.कोणी एखादा कोणत्यातरी मित्राचा दाखला देतो.बॅंकेने व्याजदर
वाढवले तर कसे त्याच्या १८ वर्षाच्या लोन पिरियड्चे २० वर्ष झाले,किंवा २ वर्षापुर्वी २१०० ने बुक केलं असल्यामुळे बिल्डर अजुनही ताबा कसा देत नाहीये वगैरे.आणि अशा विषयांना सध्या अंत नाही.लगेच मग कोणी पुढे सरसावत आपल्या बिल्डरसोबत भांडण करुन कशा घरामधे सोयी करवुन घेतल्या याच्या सक्सेस स्टोरीज़ सांगत सुटतो.थोडक्यात सांगायचं झालं तर आज आपल्यापैकी almost प्रत्येक जण या’घरघरीचा’शिकार झालेला आहे.केवळ आयटी मधे काम करतो म्हणजे सगळ्या सुखसोयी आणि अविश्वसनीय पगार हे काही प्रत्येकालाच लागू होतं असं अजिबात नाही.पण हे त्यांना कसे पटणार?त्यांच्या द्रुष्टीने तर आयटी ची माणसं म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच झाली आहे जणू.महागाई वाढली,धरा आयटीला जबाबदार,
मॉल संस्क्रुती पुण्यात रुजली,घरांच्या किंमती वाढल्या,पकडा आयटीला.अर्थात यात त्यांचा वाटा काहीच नाही असं तर मी म्हणणार नाही.पण किती दिवस याचं advantage बिल्डर्स घेणार?

सगळीकडे आज एकच रोना आहे.जागांचे भाव कमी होत नाहीत त्यामुळे potential buyersना घरं घेता येत
नाहियेत.आणि कारणं काहीही असोत,बिल्डर घराचे भाव कमी करत नाहीयेत.या खेळामधे कोण आधी वार करतो किंवा कोण आधी हार मानतो हे पहायचं आहे.इथे प्रत्येकाला ठाउक आहे की आजच्या घडीला जागेचा जो भाव आहे तो वाढवलेला आहे,artificial आहे.त्या त्या जागेची लायकी नसताना केवळ वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे.म्हणुन तुर्तास ’थांबा आणि वाट पहा’असा मंत्र अवलंबल्या जाऊ शकतो.पण ज्यांना घराची घाई आहे त्यांचं काय?ते तर बिचारे फ़सलेच ना?

आज पुण्यामधे किमान ५० तरी नवीन कंस्ट्रक्शन्ज़ चालु असतील.त्यामधे बकरे मिळायला बिल्डर्सना जास्ती वेळ लागत नाही.राजा श्रीमंत होत चालला आहे अन प्रजा गरीब होत चालली आहे.किती दिवस चालणार हे सगळं?

असले सगळे विचार माझ्या मनात येउन गेले.तो गरीब बिचारा सेल्समन आमच्या उत्तराची वाट बघत दुसरया
गिरहाईकाकडे वळला होता.अशा तरहेने अपमानित होऊन आम्ही तिथुन निघालो आणि स्वारी दुसरया स्टॉलकडे वळली.पहिल्या आणि दुसरया स्टॉलमधे फ़रक इतकाच होता की दुसरया ठिकाणी broture बरोबर एक छान प्लास्टिकची पिशवी मिळत होती!!तरीच म्हणलं त्यांच्या स्टॉलवर इतकी गर्दी का होती ते ! लवकरच आजुबाजुला सारख्या पिशव्या बाळगुन फ़िरणारे लोकं दिसायला लागले. ते नाही का,घराजवळ रिलायन्स फ़्रेश किंवा सुभिक्षा उघडलं की परिसरातल्या सगळ्यांच्या हातात त्यांच्या रंगीत पिशव्या दिसायला लागतात,तशातला प्रकार होता तो!प्रत्येक स्टॉलवर थोडा थोडा अपमान सहन करत करत कसाबसा एक सेक्शन संपवला तर पाहतो काय? आणखीन २ हॉल बाकी होते.याचा अर्थ ३ हॉलमधे मिळुन त्यांनी थट्टा मांडली होती!
’पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’च्या धर्तीवर ,exhibition अभी बाकी है मेरे दोस्त..असं म्हणायची वेळ आली.परत नव्या जोमाने आम्ही घरं हूडकायला सुरुवात केली आणि ३ तासांच्या या थरारनाट्यामधुन कसेबसे बाहेर पडलो!!

गाडीपाशी जाताना माझ्या मनात,घराच्या संदर्भात जास्ती काही हाती लागलं नाही यापेक्षा भाजी घ्यायला एक छानशी पिशवी मिळाली आणि साधारण एक किलो रद्दी जमली याचाच आनंद होता !!!