Thursday, April 10, 2008
झुरळ!
माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग मी झुरळांवर लिहीन असं मला कधीही वाट्लेलं नव्ह्र्तं!! पाल,झुरळ,किडे असल्या किळसवाण्या विषयांबद्द्ल कोणी जास्ती बोलत सुध्दा नाही,मग त्यांच्या आयुष्यात डोकावुन पहायचा कोण प्रयत्न करणार? या रविवारी, सकाळ्च्या शुभमुहुर्तावर मी झुरळांना मारायचा सपाटा लावला...झुरळ हा तसा निरुपद्रवी प्राणी...असं आपल्याला वाटत असतं कारण आपण त्याच्या जास्ती नादी लागत नाही...पण रविवारी सकाळी सुखाने झोपलेले असताना तुमची आई जर घरभर झुरळ,झुरळ असं ओरडत सर्वात शेवटी तुमच्या खोलीमधे शिरली तर,दोष कोणाला द्यायचा?आईला की झुरळाला?आमच्या गरीब बिचाऱ्या आईच्या हक्काच्या स्वयंपाकघरावर त्याने ताबा मिळवला होता ना! आता हे अतिक्रमण आईला थोडी पटणार आहे? दिसेल त्या कोपऱयामधे आपल्या इवल्याश्या मिश्या फ़ेंदारत झुरळांनी मोर्चेबंदी केली होती.तशी आमची आई पण धीट आहे,तिच्या बालेकिल्ल्यावरच शत्रुने कब्जा केला असल्यामुळे तिची पण पंचाईत झाली.तरी बरं,मी घरातच रहात असल्यामुळॆ तिला तशी शत्रुंची सवय आहे!पण हे असले शत्रु म्हणजे फ़ारच वाईट, नाही का.तर,सांगायचा मुद्दा असा की, रविवाराच्या सकाळी माझी झोपमोड करायला हे प्राणी जबाबदार आहेत असं लक्षात आल्यावर मात्र मी त्यांना धडा शिकवायच्या निर्णयापर्यंत आलो.तसंही आजकाल माझं आयुष्य काही फ़ार happening नाहीये.त्यामुळे किमान झुरळांच्या(तरी)मागे लागुन माझा दिवस मी सार्थकी लावावा,असं वाटणं स्वाभाविकचं होतं. असा उदात्त हेतु आणि विचार घेउन मी प्लानिंग करायला बसलो.कुणीतरी आधी म्हणलं आहे की आधी कायम शत्रुच्या संख्येचा अंदाज घ्यावा,आणि मगंच आपापले प्लान आखावेत.त्याने विजय सुकर होतो(म्हणे!).असली भारीतली वाक्यं ना,कायम मोठ्या लोकांच्या नावावर खपवता येतात..म्हणजे,जरी नंतर पोपट झाला तरी तो दुसऱ्याच्या नावावर ढकलता येतो.आणि कुणी म्हणलं नसेल तर गुरु व्यासांनी महाभारतामधे असं कुठेतरी म्हणलं आहे असं बेधडक सांगुन टाकावं.कारण महाभारत हे इतकं भव्यं आहे की कुठेतरी याचा उल्लेख आला असंणारच!! असो.तर मी काय सांगत होतो? की शत्रुंचे संख्याबळ तर खुपच जास्त होते.अहो,साहजिकच आहे ना,production सोडुन झुरळीणींना दुसरं कामच काय असणार?सकाळी सकाळी नवरा कामावर गेला की अख्खा दिवस यांना मोकळा.त्यात मुलांची योग्य निगा राखली की झालं!त्यामुळे तरुण रक्ताच्या झुरळांची फ़ौजच्या फ़ौज मला दिसली.पर हम भी कम नही थे,हमारे पास beygon spray का ब्रम्हास्त्र था!!मी पण माझी आयुधं घेऊन मैदानात उतरलो."हल्ला बोल.." असा पुकारा करत मी दिसेल त्यावर स्प्रे फ़वारायला सुरुवात केली.अचानक झालेल्या या हमल्यामुळे आमचा शत्रु गांगरुन गेला आणि पटापट आसरा शोधायला लागला.परंतु कमानसे तीर निकल चुका था..मी सोडलेल्या फ़वाऱ्यामुळे थोडे जे फ़्रेशर्स होते ते बिचारे फ़सले आणि त्यांचं करीयर उध्वस्थ झालं.माझा पहीला प्लान तर यशस्वी झाला!या युद्धामधे जे बुजुर्ग झुरळं असतात ना,जनरली,असल्या घनघोर युद्धाची त्यांना सवय असते.अहो उभं आयुष्य लढाया करण्यात आणि मोर्चे सांभाळण्यात गेलं असतं ना.आपल्याकडे नाही का,पंजाबातल्या प्रत्येक कुटुंबातलं एक जण तरी सैन्यात असतं, तसंच यांच्यामधे पण घरटी किमान पंधरा वीस झुरळं तरी असल्या आघाडीवर लढत असणार!तर जे सगळे सिनीयर झुरळं पटापट आसरा शोधुन दबा धरुन बसले.पण आता मात्र त्यांच्या अस्तित्वाचा आणि माझ्या मर्दुमकीचा लढा होता.आताशा मला झुरळांच्या लपायच्या जागा माहीत झाल्या होत्या.साधारणपणे ते लोकं कपाटाच्या मागे,गॅसची नळी ज्या भोकातुन बाहेर येते तिथे,ट्रॉलीच्या गॅपमधे वगैरे जिथे कोणी मानव सहजासहजी पोहोचु शकत नाही अशा ठिकाणी लपणं पसंत करतात. लेकिन "छुपनेकी जगह चाहे शेल्फ़ हो या ट्रे, हर जगह पहुचे beygon power का स्प्रे!!" या thumb rule नुसार मी दिसेल त्या ठिकाणी हमला करायला लागलो.अहो, काय सांगु तुम्हाला, भुकंप झाल्यावर माणसं कशी सैरावैरा पळतात ना, तसे हे शत्रुगण इकडे तिकडे पळायला लागले हो!!खुर्च्या,कपाटं,शेगडी,काचेच्या बरण्या,फ़्रीज,टोपल्या दिसेल त्याच्या मागुन त्यांची पलटण बाहेर पडु लागली.आणि बॉंब वगैरे फ़ुटल्याच्या अफ़वा ऐकुन लोकं कसे पळतात त्या स्टाईलमध्ये सगळे झुरळं इकडेतिकडे पळायला लागले.अशा वेळी मजा बघण्यात फ़ार आनंद मिळ्तो.कधी कधी ते एकमेकांनाच धडकतात आणि दिशाभुल झाल्यासारखे वाट्टेल त्या direction मधे पळायला लागतात.शोलेमधे गावात गब्बरची माणसं आल्यावर गावकऱ्यांची कशी पळापळ झाली आणि हातातली कामं टाकुन पब्लिक जसं पळुन गेलं तसाच साधारणपणे scene झाला आणि हा हा म्हणता सगळ्या खोलीभर त्यांचा पसारा होऊन गेला!आता तर मी खुपच रंगात आलो होतो. शत्रु पुर्णपणे तावडीत सापडल्यावर होणारा आनंद काय असतो याचा अंदाजा मला आला!शत्रुची उडालेली दाणादाण मला मनोमन सुखावत होती.अर्थात युद्धसमाप्ती अजुन झाली नसल्यामुळे मी विजय celebrate न करता म्रुतकांची संख्या वाढवायच्या मागे लागलो. बघता बघता शत्रुने शरणागती पत्करली.ईकडेतिकडे प्रेतांचा नुसता खच पडला होता.झुरळावर जेव्हा स्प्रे चा फ़वारा होतो ना,तो प्रसंग फ़ारच भारी असतो बघा.काय होतं,ते आधी आपला जीव जाईल या कल्पनेने खुप सैरावैरा पळायला लागतात.यात आपलं मेन काम असतं ते म्हणजे फ़वाऱ्याचा नेम योग्य जागी आणि योग्य प्रमाणात पडला पाहीजे. एकदा का ते झालं की आपण काहीही न करता बसुन रहायचं.बाकी सगळं "तो"(कर्ता करविता!) च करतो!हळुहळु झुरळाच्या हालचाली मंदावतात.एकंदरीत त्याच्या लक्षात येतं, की अंत आता जवळ आला आहे.मग सर्वात शेवटी तो last try करून पाहतो.सगळे प्राण एकवटुन,एकदा हात पाय झाडुन दाखवतो.तोपर्यंत जर विषाचा अंमल कमी झाला असेल तर सुटका व्हायची थोडी तरी शकयता असते. otherwise उताणा पडुन,दोन्ही(किती का असेना)पाय छातीशी दुमडुन तो आकुंचन स्थिती मधे मरण पावतो!!अर्थात हा आपल्याकरता साधा प्रसंग असला तरीही ज्यांच्या घरचा कमावता पुरुष माणुस जातो त्यांच्यासाठी तर हा फ़ारच ह्रुदयद्रावक सीन असणार!या प्राण्यांचं एक वैशिष्ठ्य मात्र असतं बरं का,आपल्या कळपातलं कोणीतरी गेलं आहे हे त्यांना लगेच समजतं.हा sixth sense आहे का आणखीन काही,यावर अधिक संशोधन व्हायची गरज आहे. आणि हे संशोधन जर अमेरिकेसारख्या प्रगत देशाने केलं तर त्याचा impact पण लवकर होईल आणि एकंदरीतच सगळ्या प्रकाराला एक "वजन" प्राप्त होईल.काय आहे ना,अमेरिकेने काहीही जरी शोध लावला तरी जग त्यांना डोक्यावर बसवते.मग तो कितीही फ़ालतु का असेना,त्याचा काही खप नाही. तर,"आपल्यातलं" कोणीतरी गेलं आहे हे समजल्यावर सगळे जणं त्या प्रेताच्या जवळ पोचतात.त्यातल्यात्यात त्यांच्यात एखादा जो धीट पोरगा असतो, तो जवळ जाऊन परिस्थितीचा अंदाज घेऊन येतो.म्हणजे battlefield वर शांतता आहे ना, आणि संभाव्य (तुम्हाला काय वाटलं,संभाव्य काय फ़क्त खेळाडुंची यादीच असते?) शत्रुकडुन हमला तर होणार नाही ना, याची खातरजमा करुन तो आपल्या बुजुर्ग मंडळींना रिपोर्ट देतो.मग एक एक करुन सगळे जणं येऊन म्रुतकाला मानवंदना देऊन जातात.आपल्याकडे "खांदा"देण्याची जी प्रथा आहे,साधारण तशीच system ते पण follow करतात.गेलेल्या झुरळाची डेड बॉडी ओढत ओढत योग्य ठिकाणी नेण्यात येते.आणि जेव्हा पुरुष मंडळी इकडच्या कार्यात गुंतलेली असतात,तेव्हा झुरळीणींच्या front वर रडारड चालु झालेली असते! आपापल्या हातातल्या छोट्या छोट्या बांगड्या फ़ोडत त्या आपलं रडणं चालु करुन देतात.त्यांचा साथ द्यायला प्रौढ झुरळीणी असतातच!लहान झुरळं,ज्यांचं बिचाऱ्यांचं हे खेळ्ण्या बागडण्याचं वय असतं त्यांची अचानकपणे भरल्या घरात रडापड चालु झाल्याने पळापळ होते.आणि कितीही लपवायचं म्हणलं तरीही कुठुन तरी समजतंच की रोज कामावरुन येणारे ,सणासुदींना आवर्जुन गोड पदार्थांची सोय करणारे,आपल्या चुकांवर हक्काने रागावणारे,छोट्या छोट्या गोष्टींना प्रोत्साहन देणारे आपले बाबा आता कधीच येणार नाहीत.आता या परिस्थिती ला tackle कसं करायचं हे देखील त्यांना माहीत नसल्याने ते सगळे जणं नुसतेच बावचळल्यासारखे एका कोपऱ्यात उभे राहतात.आता फ़ॅमिलीने स्वतःच्या अनिश्चित आयुष्याचा विचार करुन जर या लहान्यांची सोय करुन ठेवली असेल तर ठिक आहे,नाहीतर बिचाऱ्यांवर बाल कामगार म्हणुन काम करायची वेळ येते. तर अशा प्रकारे विचार करत करत मी अनेक झुरळांना यमसदनास घातलं.तरी हे फ़क्त स्वयंपाकघरामधले झुरळं झाले.आता मला पुरेशी प्रॅक्टीस झाली असल्यामुळे(आणि वेळ्ही भरपुर असल्यामुळे)माझा मोर्चा मी बाथरुमकडे वळवला.बाथरुममधले झुरळं तर आणखीनच स्पेशल असतात.जणु काही destiny's child!!कारण त्यांना जन्मत:च "पोहता"येत असतं! हो ख्ररं,तुम्ही त्यांच्या अंगावर पाणी टाकुन पहा कधी,मस्तपैकी त्या पाण्यावर पोहायला सुरुवात करतात ते.कधी कधी तर प्राणायाम केल्यासारखे ४-५ मिनीटं श्वास रोखुन पाण्यामधे राहु पण शकतात ते.अर्थात मला त्यांच्या या ट्रिक्स माहीती असल्याने मी पुर्ण तयारीनिशी गेलो आणि ५ मिनीटांमधे तिकडची बाजी पण मारुन आलो!काय करायचं माहीती आहे का,खुप जोरात त्यांच्या अंगावर पाणी मारायचं.पोहायची जरी सवय असली तरी एकदम त्सुनामी आल्यावर सगळ्यांचीच पळापळ होणार ना! तर मग ते या धक्क्यातुन सावरायच्या आत लगेच स्प्रे चा मारा करुन निर्णायक चाल करायची.आतापर्यंत अनेक झुरळांचा नायनाट मी केला असल्यामुळे हे सगळे गनिमी कावे मला माहीत होते.त्याचाच फ़ायदा घेउन मी बाजी पलटवली! हे सगळं करेपर्यंत जवळ्पास २ तास गेले होते.पण या २ तासात आमच्या घरातल्या सगळ्या मेंबर्सचा विश्वास संपादन करण्यामध्ये मला यश मात्र जरूर आलं होतं!आणि मुख्य म्हणजे आईला त्रास देणारे आता काही दिवस तरी वचकुन राहतील या कल्पनेने खुश होऊन आईने एकदम गोड वगैरे बनवलं.मला आठवतयं,नोकरी लागल्यावर देखील मला इतका मान मिळाला नसेल तितका या लढाईने मला दिला.अशा प्रकारे मोहिम फ़त्ते करुन मी माझा दिवस सार्थकी लावला!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
He ek uttam darjach "samar varnan" aahe. Te vishalnech lihil aslyach agdi vishaya pasunch padopadi janvat rahat.
Vachtana agdi prasang dolya samor ubha kela aahe lekhakane. Yatun lekhakachi vishayatil gambhirya varnan karaychi hatoti disun yete. "तरी बरं,मी घरातच रहात असल्यामुळॆ तिला तशी शत्रुंची सवय आहे!" vakyan vrun lekhakal satya paristhiti chi jaan aslyache lakshyat yete.
"तसंही आजकाल माझं आयुष्य काही फ़ार happening नाहीये." vgre vakya varun lekhakane sadya vartamana var tashere odhalyache disun yete.
Lekhat janavnari zuralan baddalchi aatmiyata lekhakachi agatikata darshavate.
Ashya zurali yaddhat zuralancha honara sanharrache kiti barik varnan kele aahe!!! Tyachya sobat zuralanchya samaj jivanat nirman honare prashn yanche pn agdi marmik varnan disate. Yatunch lekhkala tyachya pudhil lekhnacha vishay tr suchvaycha nasel na? Udaharnch dyaych zal tar "Zuralanche samajik prashn" kinva "gharguti safsafai aani zural" ityadi...
"आपल्या कळपातलं कोणीतरी गेलं आहे हे त्यांना लगेच समजतं.हा sixth sense आहे का आणखीन काही,यावर अधिक संशोधन व्हायची गरज आहे." hi vakye lekhakachya bhavipidhi kadun aslelya apekshach sangat aahet; ase aapalyala vatat nhi kay??
mala hi vatla navhta mi sakali sakali vachen to pahila blog zuralavar asel;)
simply hilarious!!
welcome aboard on d blog-wagon :)
haha..jhakaas post......for this act of highest bravery in the face of the enemy the government of india has decided to decorate you with the Param Vir Chakra.
The award will consist of unlimited stock of Baygon spray for the rest of your life:))
And hope that the intruders stay out of the LoC whenever I come to your place for lunch the next time around hehehe.
aing ching chong ...
Post a Comment