Saturday, May 3, 2008

गंगेची story!!

महाभारत माझ्या एकदम आवडीचा विषय...का माहित नाही,पण मला overall महाभारत कायमच fascinating वाटत आलं आहे.त्याचा एकंदरीत आवाका,involve झालेली पात्रे,एकंदरीत magnitude हे इतकं सुरस,रम्य आणि चमत्कारिक आहे,की वाचायची सहनशक्ती संपते पण महाभारत संपत नाही!पण खुप जणांना ते वाचणं थोडं अवघड आणि बोजड जातं.जड भाषेचा परिणाम असेल कदाचित किंवा ते खुप जुनं असल्यामुळे संदर्भ लागत नसतील पण एकदा का महाभारताची गोडी लागली की संपलं सगळं !! त्यातले events इतके आहेत की फ़ारच भारी बाबा...सर्वात मजा कधी वाटते जेव्हा मागचा reference बरोब्बर नेमका येउन match होतो तेव्हा.e.g. खुप सुरुवातीच्या event मध्ये अंबा पितामह भिष्मांना शाप देते की तुमच्या म्रुत्युला मी कारणीभुत असणार आहे त्यावेळी आपल्याला वाटतं की अरे,त्यांचा वध तर स्त्री किंवा पुरुष करु शकणार नाहीये कारण दोघांनाही तेवढे rights मिळालेले नाहीत.पण अंबा पुढच्या जन्मात किन्नर बनुन जन्म घेते(In the form of शिखंडी) आणि वादा पुरा करते!! जो वादा किया वो निभाना पडेगा...[:)] dont you think this is
extraordinarily fascinating? Atleast I feel so! असो.तर आज मी जी story सांगणार आहे ती आहे प्रुथ्वीवर गंगा नदी कशी आणली आणि त्या घटनेमध्ये कोणकोणते star players होते.हे सगळं core महाभारतामध्ये नसलं तरीही as a starter interesting आहे!So lets begin!!

एकदा काय असतं,एक ना सगर नावाचा राजा असतो. त्याला ना दोन(च) राण्या असतात.जास्ती लाड नाही.छोटं कुटुंब,सुखी कुटुंब!! त्यांची नावं असतात शैव्या आणि वेदमी. शैव्याला १ मुलगा-असमंजस नावाचा.हसु नका, खरच असमंजस नाव आहे.हे म्हणजे असं आहे बघा, आधीच वडिल जितेंद्र त्यात मुलगा निघाला तुषार कपुर!! मग काय होणार पुढे!आणि जे होणार त्याला audiance का जबाबदार राहणार? तर,असा तो असमंजस नावाचा मुलगा.तरी बरं,शैव्याला किमान मुलगा तरी होता; त्या वेदमीला तर मुलगाच नाही.मला तर वाटतयं, कोणाला हया असमंजसाकडुन फ़ारश्या अपेक्षा पण नसणार,की हा मोठा होऊन (तरी) काही उपयोगाला येइल म्हणुन. तर मग सगर राजानी एक emergency meeting बोलावली आणि एक भारीतली ऊपासना करायचं ठरलं.मग सगळ्यांनी मिळुन शंकराची ऊपासना केली.लवकरच ते खुष झाले(त्यांना त्या काळी तेवढंच जमायचं.काहीही झालं की खुश व्हायचं आणि लगेच वर देउन मोकळं व्हायचं.आणि जरा राग आला की तिसरा डोळा थोडा किलकिला करुन public ची पळापळ करुन टाकायची!!) आणि नेहमीच्या style मध्ये एक वर देउन टाकला! आता या वरामुळे वैदमी ला दिवस तर गेले; पण projected नऊ महिन्यांऐवजी शंभर वर्षं(!!) लागली. पहा, आहे का नाही गंमत,उगाचच नाहिये महाभारत भारी. असल्या unpredicted घटना घडत राहतात सारख्या सारख्या! तर,या १०० वर्षांनंतर एकदम एक मोठा मांसाचा गोळाच झाला!! मुलगा बिलगा काही नाही! हे म्हणजे अती झालं बरं का! मग सगळीकडे रडारड आणि once again शंकर,शंकर. एवढा सगळा गोंधळ पाहुन शंकर स्वतः जातीने आले खाली आणि त्या गोळ्याचे ६०००० भाग केले!(वेदमी fix रडली असेल,माझा पोटचा गोळा हिरावुन घेतला करुन!!) त्या भागांचे लगेच ६०००० मुलं झाले! माई,तुला मुलं हवी होती ना,घे मग! मोजत बस आता!!
आता इतका मोठा समरप्रसंग घडुन गेल्यावर सुद्धा सगर राजाचा उत्साह शाबुत होता.म्हणे,मला आता अश्वमेघ यज्ञच करायचा.आता त्यात १०० यज्ञ असतात.तर बसले आपले राजेसाहेब १०० यज्ञ करायला.आणि आणखीन मजेशीर गोष्ट म्हणजे त्यापैकी ९९ ओके पण झाले!जर शंभरावा ओके झाला असता तर आपल्या इंद्राचं सरकार अल्पमतात येउन थोड्याच वेळात पडलं असतं!त्यामुळे इंद्राने पटापट हालचाल केली आणि आपले हेर पाठवुन अश्वमेघ यज्ञवाले घोडे कपिल नावाच्या ऋषींच्या आश्रमात नेउन बांधुन ठेवले.आता यज्ञवाले घोडे गायब झाले म्हणल्यावर सगळ्या ६०००० पोरांची पळापळ झाली!लगोलग सगळे जणं घोडे,घोडे करत इकडे तिकडे फ़िरायला लागले.तेवढ्यात कोणाला तरी दिसलं की घोडे कपिल सरांच्या घरी आहेत करुन.मग फ़ुल्ल celebration करत सारे बच्चोंने जोश मे आके होश गवाँ दिये और घोडोंको लेकर भाग खडे हुए!that too without permission!!
आता हे जरा जास्तीच झालं बरं का!एखाद्या ऋषींच्या घरुन without permission संपत्ती पळवुन न्यायची हा फ़ारच मोठा अपमान आहे त्या respective ऋषींचा.अर्थातच कपिल सरांना पण असच वाटलं आणि त्यांनी चिडुन सगळ्यांना भस्म करुन टाकलं!हे ऋषी मुनी फ़ार डेंजर लोकं असतात बाबा,शाप बीप हे त्यांचं रोजचं काम असतं,its a prat of their curriculum!कदाचित त्यांचा greatness हा no.of शापस् given वरुन ठरत असेल!!तर कपिलजींकी दुवाँए रंग लायी व सगळे कुलदीपक क्षणार्धात भस्म झाले!थोडेसे वा्रयामुळे इकडेतिकडे उडुन पण गेले असतील!!आता आपल्या मुलांचा हा प्रताप ऐकुन सगर राजाचा उरलासुरला उत्साह संपला आणि अखेरीस तो वनामध्ये निघुन गेला.And now my friends,the most awaited scene of the entire episode takes place.गेममध्ये असमंजसाची entry होते!तो बिचारा, भोळाभाबडा, भावंडांना परत आणण्याकरता तपस्या करायला बसला.पण असमंजसच तो, फ़ारसा talented नव्हताच;काय जमणार बिचाऱ्याला!तपस्या करता करताच गेला तो तर!
तत्पुर्वी एक काम मात्र केलं होतं. त्याला होता अंशुमन नावाचा पोरगा.त्याने कपिल ऋषींची फ़ुल्ल सेवा बिवा करुन त्यांना impress केलं आणि घोड्यांना back to pavillion आणलं!!आणि thankfully तो यज्ञ तरी पुर्ण झाला. पण आता या ६०००० रत्नांचं काय करायचं?ते तर अजुन पापीच असल्यामुळे मुक्त झाले नव्हते.मग आपला गुणी बाळ अंशुमन परत आपला कपिल ऋषींकडे गेला. त्यांच्याकडे तर एक से बढ्कर एक आयडियाज होत्या.म्हणे,गंगेला जमीनीवर आणा.तिच्यात अंघोळ केली की झालं काम आपलं! सगळे पापं वगैरे धुवुन एकदम चकाचक!
हे ऐकुन अंशुमन खुष झाला.केलेल्या मेहेनतीचं फ़ळ मिळायची वेळ जी आली होती.पण आत्तापर्यंत अंशुमन प्रयत्न करुन थकुन गेला होता. त्यामुळे त्याला अजुन जोश दाखवणं जमलं नाही.त्यामुळे त्याचा मुलगा-दिलीप याने ट्राय मारला.पण नावच दिलीप म्हणल्यावर काय खप नाही.या दिलीपचा मुलगा म्हणजे भगीरथ.याच्या अंगचं पाणी काही न्यारंच म्हणुन गंगेचं पाणी पृथ्वीवर आणायला याला फ़ायनली जमलं.And thats how this whole saga finally came to an end.भगीरथाने भरपुर प्रयत्न करुन गंगेला जमीनीवर आणलं म्हणुन मराठी मधे extreme level च्या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न असं म्हणतात. अशा प्रकारे माझी कथा सांगुन संपली आहे.I just hope that,मला लिहिताना जेवढं हसायला आलं त्याहुन जास्ती तुम्हाला वाचताना येईल!!

2 comments:

Alice said...

Too good!! Hasun hasun vedi jhali me. Looking forward for some more articles from you...
~ Ashwini

Kaps said...

wa wa wa ek bug solve karayala akhya 3 pidhyancha naynaat karawa lagla